महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

आज आत्ता... हंसराज अहिर यांच्या वाहनांच्या ताफ्यातील वाहनाचा अपघात, 4 जण गंभीर जखमी - aaj atta lIVE

आज आत्ता... माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांच्या ताफ्यातील सुरक्षा वाहनाचा अपघात, 4 जण गंभीर जखमी

AAJ ATTa LIVE 25-09-2019

By

Published : Sep 26, 2019, 8:56 AM IST

Updated : Sep 26, 2019, 3:19 PM IST

  • 2:55 PM ठाणे - डोंबिवलीत चोरट्यांचा धुमाकूळ... मोबाईलचे दुकान फोडून 17 लाखांचे मोबाईल लंपास... घटना सीसीटीव्हीत कैद
  • 02:49 PM मुंबई - विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसमध्ये अंतर्गत नाराजीचा सूर... उमेदवार निवडीबाबत काँग्रेस ओबीसी विभागात नाराजी... केंद्रीय नेतृत्वाची भेट घेत ओबीसीला 12 जागा देण्याची पत्राद्वारे मागणी
  • 02:44 PM नांदेड - शरद पवार यांच्यावर ईडीने गुन्हा दाखल केल्याप्रकरणी राष्ट्रवादी व युवक काँगेसचा निषेध... भोकरफाटा येथील चौकात राष्ट्रवादी व युवक काँग्रेसच्या वतीने नांदेड-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन.... मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिकात्मक म्हणून टरबूज फोडून निषेध करण्यात आला
  • 02:16 PM यवतमाळ - कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर आढळले नवजात जिवंत मुलीचे अर्भक
    02:16 PM रत्नागिरी - नोंदणी नसतानाही समुद्रात मासेमारीला गेलेली नौका बुडाली... सुदैवाने जीवितहानी नाही
  • 02:10 PM : मुंबई - बारामतीचे आमदार अजित पवार यांच्याशीही पुराच्या संदर्भात सकाळी चर्चा केली - मुख्यमंत्री
  • प्रशासन सर्वतोपरी मदत पोहोचवत आहे...
  • 01:05 PM : ठाणे - पीएमसी बँक अडचणीत आहे... सरदार तारासिंग यांचा मुलगा संचालक आहे मग कारवाई कधी करणार जितेंद्र आव्हाड यांचा प्रश्न... शिवसेनेचे वायकर यांचा मातोश्री क्लब खात्यातून पैसे काढून घेतो मग सत्ताधाऱ्यांना बातमी लिक होते... जनसामान्यांनी काय करायचं?
    12:42 PM : ठाणे - दादर परिसरातील महानगर पालिकेच्या इमारतीच्या 6 व्या मजल्यावरून उडी मारून सुमित दिनकर कुरळे याने केली आत्महत्या
  • 12:13 PM : सांगली - धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर यांची वंचित बहुजन आघाडीला सोडचिठ्ठी..पुन्हा भाजपत स्वगृही परतण्याचा मार्गावर...पुढील भूमिका येत्या 2 दिवसात स्पष्ट करणार असल्याचे संकेत... मुख्यमंत्री धनगर समाजाच्या आरक्षणाबाबत सकारात्मक भूमिका घेत असल्याने समाजाचा भाजपसोबत जाण्याबाबत दबाव - पडळकर
  • 12:10 PM : पुणे - पुरात अग्निशमन दलाच्या जवानांनी वाचवले दीड वर्षाच्या बाळाचे प्राण
  • 12:08 PM : नाशिक - मागेही मंत्री महाजनादेश यात्रेत अडकले होते...म्हणून पुराकडे लक्ष दिले नाही... छगन भुजबळांचा सत्ताधाऱ्यांना टोला... पुण्यात सध्या पूरपरिस्थिती गंभीर आहे...कितीही मदत केली तर सांगली-कोल्हापूर सारखे शहर पुन्हा उभे राहायला दहा वर्षे लागतील... मंत्री तिकीट वाटपावर चर्चा करत आहेत... पुण्याकडे लक्ष द्यायला पाहिजे...तिकडे नंतर लक्ष दिले तरी चालेल - छगन भुजबळ
  • 9:43 AM : वर्धा - माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांच्या ताफ्यातील सुरक्षा वाहनाचा अपघात... चंद्रपुरहुन नागपूरला जात होता ताफा... जाम चौरस्त्याजवळ कांडळी नदी पार केल्यावर झाला अपघात... CRPF च्या वाहनातील चालक गंभीर जखमी तर अहिर सुरक्षित... अहिर यांचे वाहन पुढे गेल्यावर मागचे वाहन कंटेनरला धडकले होते... आणखी 2 जवान जखमी असल्याची माहिती... तर सर्व जखमींना नागपूरच्या ऑरेंज सिटी रुग्णालयात दाखल करण्यात आले, वरिष्ठ भाजप पदाधिकाऱ्यांनी घेतली रुग्णालयात धाव
  • 9:43 AM : पुणे - शहरात झालेल्या अतिवृष्टीमुळे शहरी भागातील 7 तर ग्रामीण भागातील 3 जणांचा मृत्यू
  • 9:51 AM : सांगली - कृष्णा नदी क्षेत्रात होत असलेल्या मुसळधार पावसाने आणि कोयना धरणातून सुरू असलेल्या विसर्गामुळे सांगलीत कृष्णा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ - कृष्णा नदीची पाणी पातळी 24 फुटावर पोहोचली... कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने औदुंबर मधील दत्त मंदिरात रात्री पाणी शिरले
  • 9 : 09 AM : पुणे - खेड-शिवापूर परिसरात मुसळधार पावसात 5 जण गेले वाहून...तिघांचे मृतदेह सापडले..दोघांचा शोध सुरू.. ग्रामीण पोलिसांची माहिती
  • 8:34 AM: पुणे - रौद्ररूप धारण केलेल्या पावसाचे आतापर्यंत सात बळी, तर आणखी दोघे बेपत्ता
  • 8:29 AM : पुणे - बारामती, कऱ्हा नदीला आलेल्या पुरामुळे नदीकाठच्या लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे काम सुरू
  • 8:24 AM : पुणे - अतिवृष्टीमुळे पुणे जिल्ह्यातील 5 तालुक्यातील शाळा, महाविद्यालये यांना आज 26 सप्टेंबर रोजी सुट्टी - जिल्हाधिकारी नवल किशोर राम
  • 8:21 AM: पुणे - बुधवारी मध्यरात्री झालेल्या अतिवृष्टीत नांदेड सिटी कडे जात असलेली कार वाहून कार मधील एकाचा मृत्यू
  • 2:57 AM : पुणे - दोन पुरुष, दोन महिला आणि एका लहान मुलाचा मृतदेह सापडला... दांडेकर वस्ती, आंबील ओढा परिसरातील घरात पाणी शिरल्यामुळे तेथील रहिवाशांना राष्ट्र सेवा दलाच्या निळू फुले कला मंदिरात हलविण्यात आले....
  • 2:41 AM: पुणे - पावसाचा हाहाकार... पुण्यातील दत्तवाडी पोलिसांच्या हद्दीत वाहून गेलेले पाच मृतदेह सापडले
Last Updated : Sep 26, 2019, 3:19 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details