महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

आज.. आत्ता.. सावरगाव घाट येथे गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत दसरा मेळाव्याचे आयोजन - aaj atta

झरझर नजर.. दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर

आज आत्ता

By

Published : Oct 8, 2019, 7:46 AM IST

Updated : Oct 8, 2019, 2:28 PM IST

  • 12:42 PM : रत्नागिरी -संजय कदम हे चुकून आमदार झाले... सुर्यकांत दळवी यांनी सामंजस्याची भूमिका घेऊन मतदारांच्या अडचणी सोडवायला हव्या होत्या... गेल्या वेळी दळवींच्या हट्टामुळे त्यांना उमेदवारी मिळाली पण जनतेने त्यांना नाकारलं - योगेश कदम
  • 12:41 PM : बीड -बीड जिल्ह्यातील सावरगाव घाट येथे दुपारी 1 वाजता गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत दसरा मेळावा होत आहे...राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे या दसरा मेळाव्याच्या निमित्ताने दिल्लीश्वरांना दाखवणार आपली ताकद... दसरा मेळाव्यासाठी राज्यभरातून मोठा जनसमुदाय सावरगाव घाट येथे जमा होत आहे.
  • 11:34 : अमरावती -मोदींची स्तुती करता आणि आमच्या भावना दुखावतात... रवी राणा यांच्या विरोधात मुस्लिम नेत्यांचा रोष
  • 10:03 AM : कोल्हापूर -उमेदवारीअर्ज माघारीसाठी समरजीतसिंहराजे घाटगे यांच्या आईंना धमकी... समरजितसिंहराजे कागल विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार... सुहासिनीदेवी घाटगे यांना पाच वेळा फोन करून देण्यात आली धमकी, कागल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
  • 9:42 AM : नागपूर - 2014 मध्ये परिवर्तन आले, त्या आधीच्या सरकार संदर्भात निगेटिव्ह नाकारात्म भावना निर्माण झाली होती... आर्टिकल 370 संदर्भात जनतेची इच्छा होती, ती सरकारने पूर्ण केली, पंतप्रधान आणि गृहमंत्री यांचे कार्य अभिनंदनीय... चांद्रयानामुळे जगात आपल्या देशातील वैज्ञानिकांचे कौतुक होत आहे. आत्मविश्वास,सतत प्रयत्न करणार असा विश्वास देशात आहे - मोहन भागवत
  • 9:28 AM : नागपूर -आज विजयादशमी निमित्त रेशीमबागेत एक ऊर्जा जागृत झाल्याचं दिसून येत आहे... देशात अनेक वर्षांपासून गरिबी, शिक्षण, आरोग्य सुविधांचा अभाव... 266 दशलक्ष भारतीय नागरिक आजही निरक्षर, बालमृत्यू व कुपोषण आजही कायम - शिव नाडर
  • 9:27 AM : गोंदिया -६ हजार पाण्याच्या तसेच शीत पेयाच्या रिकाम्या बॉटलने गोंदियात शारदा मंडळाने साकारला अनोखा देखावा
  • 8:45 AM : पुणे -शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची पर्वती भागातील लक्ष्मीनगरच्या सह्याद्री मैदानावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पथसंचलनला हजेरी... वय वर्षे 98 असताना पथ संचलनाला उपस्थित....संघाच्या गणवेशात हजेरी
  • 8:14 AM : नागपूर -राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शास्त्रपूजेत पारंपरिक शस्त्रासह पहिल्यांदाच मिसाईलची प्रतिकृती देखील ठेवण्यात आली आहे... जनरल व्ही.के सिंग, नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित
  • 07:09 AM : अहमदनगर - शरद पवार यांची पारनेर येथे सकाळी 11 वाजता जाहीर सभा... उद्या नगरमध्ये उद्धव ठाकरे
  • 6:46 AM : नागपूर - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी उत्सवाला सुरुवात... एचसीएल कंपनीचे संस्थापक शिव नाडर हे प्रमुख पाहुणे म्हणून राहणार उपस्थित
    राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी उत्सवाला सुरुवात
Last Updated : Oct 8, 2019, 2:28 PM IST

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details