६.३० - भाजप 'हाऊसफुल'; आता भरती नाही - मुख्यमंत्री फडणवीस
अमरावती- भाजपमध्ये गेल्या काही दिवसांत इतर पक्षातून येणाऱ्या नेत्यांचा ओघ सुरू झाला आहे. या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये जागा फुल्ल झाल्या असून आता भरती नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगितले. अधिक वाचा..
५.३० - सध्या राजकीय स्थित्यंतराचा काळ आहे - अमोल कोल्हे
पुणे - राष्ट्रवादीतून बाहेर पडणाऱ्या लोकांमुळे उलट पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये वेगळी जिद्द निर्माण झाली आहे. राजकारणात 20 पंचवीस वर्षांनी स्थित्यंतर होत असते, सध्याचा काळ स्थित्यंतराचा आहे, असे वक्तव्य राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी केले आहे. अधिक वाचा..
५.०० - पिचड यांच्या भाजप प्रवेशामुळे महादेव कोळी समाज नाराज - अनंत तरे
ठाणे - मधुकर पिचड यांनी भाजपमध्ये प्रवेश केला असला, तरी महादेव कोळी समाज मात्र नाराज झाला आहे. असे वक्तव्य शिवसेना उपनेते अनंत तरे यांनी केले आहे. अधिक वाचा..
४.०० - तीन तलाकला राष्ट्रावादीचा विरोधच, शरद पवारांनी सांगितले राज्यसभेतील गैरहजेरीचे कारण
सातारा -विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आता जागा वाटपाच्या जवळपास पोहचली आहे. या वेळी अमोल कोल्हे आणि बाकी तरुण सहकाऱ्यांना निवडणूक प्रचारात उतरवणार आहोत. अधिक वाचा..
३.२० - संततधार पावसामुळे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 बंद होण्याची शक्यता
नंदुरबार -राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वर नवापूर ते कोंडाईबारी घाटा दरम्यान रस्त्याची अवस्था अत्यंत वाईट झाली आहे. यामुळे या रस्त्यावर अपघातांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. अधिक वाचा...
३.०० -सानिया मिर्झा मोठ्या ब्रेकनंतर पुन्हा मैदानात उतरणार
नवी दिल्ली- भारताची महिला टेनिसपटू सानिया मिर्झा पुन्हा टेनिसच्या मैदानात उतरणार आहे. आई झाल्यानंतर सानिया मागील काही काळापासून टेनिसपासून लांब होती. अधिक वाचा..
२.४० -भाजपच्या 'महाजनादेश' यात्रेला सुरुवात; राजनाथ सिंह, मुख्यमंत्र्यांसह अनेक नेते उपस्थित
अमरावती- विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपतर्फे महाजनादेश यात्रेचे आयोजन करण्यात येत आहे. 1 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट दरम्यान काढण्यात येत असलेल्या या यात्रेच्या पहिल्या टप्प्याची सुरुवात आज अमरावती जिल्ह्यातील राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या समाधी स्थळ असलेल्या गुरुकुंज मोझरी येथून झाली आहे. अधिक वाचा..
२.३० -प्रतिष्ठेच्या अॅशेज मालिकेला आजपासून सुरुवात
लंडन - इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया या कट्टर प्रतिस्पर्धी संघांमध्ये आजपासून ऐतिहासिक अॅशेस मालिकेला सुरुवात होणार आहे. अॅशेज मालिका दोन्ही संघासाठी प्रतिष्ठेची मानली जाते. आज बर्मिंगहॅम येथे अॅशेस मलिकेतील पहिल्या कसोटी सामना खेळला जाणार आहे. अधिक वाचा..
२.२० -जालना जिल्ह्यातील तरुणीवर मुंबईत सामूहिक बलात्कार; पीडितेचा जीवन–मृत्युशी संघर्ष
औरंगाबाद - मुंबई शहरात आपल्या भावाकडे राहायला गेलेल्या 19 वर्षीय तरुणीवर चार जणांनी पाशवी बलात्कार केल्याने पीडिता गंभीर जखमी झाली आहे. घाटी रुग्णालयात तिचा जीवन-मृत्यूशी संघर्ष चालू आहे. अधिक वाचा..
२.०० - दुष्काळी भागातील १० वी, १२ वीच्या विद्यार्थ्यांची संपूर्ण परीक्षा फी होणार माफ