महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

आज.. आत्ता.. तापी, पूर्णा नद्यांना पूर आल्याने हतनूर धरणाचे सर्व दरवाजे उघडले - रमेशकुमार

झरझर नजर... दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचा एका क्लिकवर..

झरझर नजर

By

Published : Jul 29, 2019, 10:06 AM IST

Updated : Jul 29, 2019, 10:22 PM IST

  • 9.10 PM - जळगाव - तापी, पूर्णा नद्यांना पूर आल्याने हतनूर धरणाचे सर्व दरवाजे उघडले
  • 8:40 PM मुंबई - भाजपच्या मागणीनंतर मंदिराबाहेर गायी गुरे बांधणाऱ्यांवर १० हजारांचा दंड
  • 8.05 PM नागपूर -नागपुरात काँग्रेसचे चार-पाच नेतेच शिल्लक आहेत. त्यांच्या पक्षातील खालची फळी आधीच भाजपमध्ये आली. त्यामुळे आमचा कोटा फुल झाला असून काँग्रेसच्या नेत्यांनी काँग्रेसमध्येच राहावे, असा सल्ला राज्याचे उर्जामंत्री आणि नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला.
  • 7.38 PM ठाणे -शहापूर तालुक्यातील भातसा धरण भरले
  • 6:30 PM - जालना -बुरशी आलेला रेशनचा गहू उतरून घेण्यास दुकानदारांचा नकार. मनमाड येथील फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचे अधिकारी चौकशीसाठी जालन्यात
  • 6:19 PM गडचिरोली -जिल्ह्यात मुसळधार पाऊस; चार तालुक्यातील शंभर गावांचा संपर्क तुटला. अनेक छोट्या नाल्यांना पूर, गेल्या 24 तासात जिल्ह्यात 42.3 पावसाची नोंद झाली आहे. यात सर्वाधिक 83 मिमी पाऊस कुरखेडा तालुक्यात झाला आहे. पावसामुळे अनेक मार्ग बंद झाले असून दक्षिण गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड, एटापल्ली, सिरोंचा व अहेरी तालुक्यातील सुमारे शंभर गावांचा संपर्क तुटला.
  • 6:13 PM - मुंबई - खरीप हंगाम 2019 मध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजनेत राज्यातील सर्व शेतकऱ्यांना सहभागी होता यावे यासाठी योजनेला मुदतवाढ दिली आहे. दि. 31 जुलैपर्यंत शेतकऱ्यांनी विमा प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे.
  • 6:01 PM नांदेड - राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बापूसाहेब गोरठेकर यांची राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष माजी आ. बापूसाहेब गोरठेकर यांनी आज अखेर राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत असल्याची घोषणा केली. तसेच जो पक्ष आमदार करेल त्याच पक्षात प्रवेश करू अशी माहिती त्यांनी नांदेड येथे पत्रकार परिषदेत दिली.
  • 5.59 PM - मुंबई -महापौर निधीत वाढ करण्याचा निर्णय; मुंबईमधील रुग्णांना प्रत्येकी 5 हजार रुपये महापौर निधीमधून मदत केली जात होती. आता 15 हजार ते 25 हजार रुपये इतकी आर्थिक मदत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निधीमध्ये वाढ केल्याने रुग्णांना होणार मदत. महापौर निधीबाबत तब्बल 8 वर्षांनी झाली बैठक
  • 5.43 PM -अमरावती - सिपना नदीला पूर, हरिसाल गावाला फटका
  • 5.37 PM - मुंबई -विमुक्त जाती, भटक्या जमाती आदी आश्रम शाळेतील शाळेतील कर्मचाऱ्यांना 7 वा वेतन आयोग लागू. ८२९ आश्रमशाळेतील ११४२७ शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना मिळणार लाभ. संजय कुटे यांनी केली घोषणा
  • 5.30 PM रायगड -बोरघाटात दरड कोसळली. चेन्नई एजस्प्रेस कर्जतला थांबविण्यात आली आहे. तर, कोणार्क वांगणीला थांबविण्यात आली आहे.
  • 5.00 PM अमरावती - मोर्शी मुख्य महामार्गवर शिरखेड जवळ पूल गेला वाहून; वाहतुक बंद. अमरावतीवरून मोर्शी वरुड आणि मध्यप्रदेशमध्ये जाणाऱ्या अमरावती मोर्शी महामार्गावरील पुल पुरामुळे वाहून गेल्याची घटना घडली आहे. त्यामुळे अमरावतीवरून मोर्शीकडे व मोर्शीकडून अमरावतीकडे जाणारी वाहतूक पूर्णतः बंद झाली आहे.
  • 4.38 PM मुंबई - दाउद इब्राहिमच्या पुतण्यावर मकोका खाली कारवाई; पोलीस कोठडीत ५ ऑगस्टपर्यंत वाढ
  • 3.55 PM - अकोला - विद्रुपा नदीला पूर, एक तरुण गेला वाहून; नागरिकांना सतर्कतेचा इशारा
  • 3.26 PM नाशिक - महापालिकेच्या पूर्व विभागाच्या जुन्या इमारतीचा काही भाग कोसळला.

* सातारा - आमदार शिवेंद्रराजे यांच्या निवासस्थानी कार्यकर्त्यांची बैठक.. भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी आग्रह

* नाशिक - गंगापूर धरणातून दुपारी 2 वाजेपासून पाण्याचा विसर्ग सुरू.. 80 टक्के धरणं भरल्याने प्रशासनाने घेतला निर्णय.. 1 हजार क्यूसेक पाणी सोडण्यात येणार.. ह्या हंगामातील पहिला विसर्ग.. गोदावरी नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा..

* रत्नागिरी- दापोलीतील खेम धरण गळती प्रकरण
तिवरे धरण फुटीनंतर प्रशासनाला जाग..खेम धरणाच्या दुरुस्तीसाठी तब्बल तीन कोटी रुपये मंजूर.. जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण यांची माहिती..जलसंपदा विभाग करणार दुरुस्तीचे काम.. जलसंपदा मंत्रालयाने मंजूर केला तात्काळ निधी..खेम धरणाच्या मुख्य भिंतीलाच लागली आहे मोठी गळती...

स्टेट बँक ऑफ इंडियाकडून सर्व प्रकारच्या मुदत ठेवीवरील व्याजदरात कपात

मुंबई - देशातील सर्वात मोठ्या स्टेट बँक ऑफ इंडियाने मुदत ठेवीवरील व्याजदरात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. ही कपात सर्व प्रकारच्या मुदत ठेवीवर लागू असणार आहे. या निर्णयाची अंमलबजावणी १ ऑगस्टपासून होणार आहे. अधिक वाचा

राजू शेट्टींनी घेतली नारायण राणेंची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

मुंबई - विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राजकीय हालचींना, भेटीगाठींना वेग आला आहे. सर्वच राजकीय पक्षांनी तयारीला सुरुवात केली आहे. अशातच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांनी स्वाभिमान महाराष्ट्र पक्षाचे प्रमुख खासदार नारायण राणेंची भेट घेतली आहे. या भेटीने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. अधिक वाचा

दुपारी 12.30 -कर्नाटक विधानसभेचे अध्यक्ष के.आर रमेशकुमार यांनी दिला राजीनामा.

दुपारी 12.01 -ज्योतीकुमारी चौधरी खून,बलात्कार प्रकरण : दोन्ही आरोपींची फाशीची शिक्षा मुंबई उच्च न्यायालयाकडून रद्द

पुण्यातील २००७ मधील 'बीपीओ कर्मचारी महिला बलात्कार आणि खून खटल्या'तील आरोपींची फाशीची शिक्षा रद्द करण्यात आली आहे. शिक्षेच्या अंमलबजावणीस अभूतपूर्व उशीर होण्याच्या कारणास्तव मुंबई उच्च न्यायालयाने शिक्षा रद्द केली. अधिक वाचा

सकाळी 11.45 -येडीयुरप्पा सरकारने विश्वासदर्शक ठराव जिंकला

गणेश नाईकांसह राष्ट्रवादीचे 52 नगरसेवक भाजपच्या वाटेवर, राष्ट्रवादीला खिंडार ?

नवी मुंबई -राज्यात आयाराम गयाराम यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला लागलेली गळती सुरूच असून आता नवी मुंबईतील राष्ट्रवादीचा चेहरा असलेले गणेश नाईक यांच्यासोबत पक्षाचे सर्व 52 नगरसेवक हे देखील पक्षाचा राजीनामा देऊन भाजपच्या वाटेवर जाणार असल्याचे कळत आहे. त्यामुळे येत्या विधानसभेच्या तोंडावर नवी मुंबईत राजकीय भूकंप येण्याची शक्यता आहे. अधिक वाचा

सकाळी 10.20 -छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात २ माओवाद्यांचा ठार करण्यात आले आहे. जिल्हा राखीव दलाच्या पथकाने कोठा परिसरातील जंगलात ही कारवाई केली. त्यांचे मृतदेह ताब्यात घेण्यात आले आहेत.

सकाळी 10.01 -कर्नाटक विधानसभेत काँग्रेस नेत्यांची बैठक सुरू.. सिद्धरामया, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष दिनेश गुंडू राव, के जे जॉर्ज, प्रियांक खर्गे, एम.बी पाटील, ईश्वर खांद्रे आणि इतर आमदार उपस्थित

सकाळी 9.55 -मुख्यमंत्री येडीयुरप्पा सभागृहात दाखल होण्यासाठी निघाले, भाजप सरकार १२ वाजता मांडणार आहे विश्वासदर्शक ठराव.

कर'नाटक' : येडीयुरप्पा सरकारची आज शक्तिपरीक्षा; काठावरील बहुमत भाजपला तारणार?

बंगळुरू - कर्नाटकमध्ये सुरू असलेल्या राजकीय घडामोडींना अद्याप पूर्णविराम मिळालेला नाही. बहुमताअभावी कुमारस्वामींचे काँग्रेस-धर्मनिरपेक्ष जनता दलाचे (जेडीएस) सरकार कोसळल्यानंतर सत्ता स्थापन करणाऱ्या भाजपपुढे सरकार स्थिर ठेवण्याचे आव्हान आहे. आज येडीयुरप्पा सरकारला विश्वासदर्शक ठरावाला सामोरे जावे लागणार आहे. त्यातच काल (रविवार) विधानसभा अध्यक्ष के. आर. रमेशकुमार यांनी आणखी १४ बंडखोर आमदारांना २०२३ पर्यंत अपात्र घोषित केले आहे. त्यामुळे भाजपलाही त्याचा फटका बसण्याची शक्यता आहे. सविस्तर वृत्त

आजम खान यांचे डोळे काढा, १ लाख रुपये मिळवा - भाजप युवा मोर्चा

आग्रा -समाजवादी पार्टीचे खासदार आझम खान यांनी संसदेच्या कार्यकारी अध्यक्षा रमा देवी यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानाचा भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी जोरदार निषेध केला. आग्रामध्ये युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी आझम खान यांच्या पुतळ्याचे दहन केले. तसेच भाजयुमो उपाध्यक्ष बंटी बघेलने आजम खान यांचे डोळे काढणाऱ्यांना १ लाखांचे बक्षीस जाहीर केले आहे. अधिक वाचा

मुंबई-गोवा महामार्ग : कशेडी घाटात भोगाव येथील रस्ता खचला

रायगड- मागील दोन दिवसांपासून मुंबईसह कोकण विभागात मुसळधार पावसाने हाहाकार माजवला आहे. या दोन दिवसादरम्यान झालेल्या पावसामुळे मुंबई-गोवा महामार्गावरील मौजे भोगाव (येलंगेवाडी) येथील रस्ता खचला आहे. त्यामुळे एकाच बाजूने वाहतूक सुरू ठेवण्यात आली आहे. या प्रकरणी सार्वजनिक बांधकाम विभागाला विचारणा केली असता, आज सोमवारी (29 जुलै) ला रस्ता दुरुस्ती करण्यात येणार असल्याचे सांगितले. दरम्यान, सुरक्षेच्या दृष्टीने खचलेल्या रस्त्याच्या ठिकाणी डिव्हाडर लावण्यात आले आहेत. अधिक वाचा

वाढदिवसाच्या सेलिब्रेशन दरम्यान 'बर्थडे बॉय'ची 7 ते 8 जणांच्या टोळक्याने केली हत्या

मुंबई - एका 27 वर्षीय तरुणाची त्याच्या वाढदिवसाच्या दिवशीच सात ते आठ जणाच्या टोळक्याने, हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना रविवारी रात्री मुंबईच्या घाटकोपर परिसरात घडली. दरम्यान, या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. अधिक वाचा

Last Updated : Jul 29, 2019, 10:22 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details