- 9.21 PM धुळे -पावसाची संततधार सुरू असल्याने रोहिणी, नदी व वाजदरे येथील बुराई नदी दुथडी वाहू लागली.
- 9.04 PM जळगाव- कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाकडून विद्यार्थी परिषद निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर
- 8.39 PM गोंदिया -माल वाहकची दुचाकीला धडक, दोघांचा जागीच मृत्यू
- 5.20 PM गोंदिया -बिबटाच्या कातड्यासह तिघांना अटक; अर्जुनी मोरगाव तालुक्यातील बाक्टी येथील कारवाई
- 5.02 PM मुंबई -भारताचा रोव्हिंग पटू दत्तू भोकनल यास हायकोर्टाचा दिलासा, एका महिलेने लावलेल्या आरोपात तथ्य नसल्याचे म्हणत दाखल गुन्हा रद्द केला.
- 5.00 PM भंडारा - जिल्ह्याच्या पवनी तालुक्यातिल गोसेखुर्द धरणाचे 33 पैकी 17 दरवाजे उघडण्यात आले, गोसेखुर्द धरणाचे 17 दरवाजे 0.5 मीटरने उघडले असून या मधून 69 हजार 358 क्युसेक पाण्याचा होत आहे विसर्ग. गडचिरोली जिल्ह्यातील नदी काठील गावाला सतर्कतेचा इशारा
- 4:50 PM मुंबई - माटुंगा माहेश्वरी उद्यान येथे बेस्टच्या बसला आग, 27 क्रमांकाची बस मुलुंड ते वरळी मार्गावर चालते. ड्रायव्हरच्या केबिनला आग, प्रवाशी बाहेर पडल्याने कोणीही जखमी नाही.
- 4:45 PM मुंबई - मुंबई विद्यापीठाने विद्यापीठ विद्यार्थी परिषद आणि महाविद्यालयीन विद्यार्थी परिषदेच्या निवडणुकीच्या वेळापत्रकाचा कार्यक्रम जाहीर केला.
- 4:42 PM अकोला - ईटीव्ही इम्पॅक्ट : प्रहारने उचलला कावाड रस्त्याचा मुद्दा; कार्यकर्त्यांनी केले जेलभरो आंदोलन
- 4:42 PM मुंबई - किंग्ज सर्कल महेश्वरी उद्यान येथे बेस्ट बसला आग लागल्याची घटना
- 4:38 PM कोल्हापूर - पंचगंगेने गाठली इशारा पातळी
- 3:39 PM परभणी - मुख्यमंत्र्यांना महाराष्ट्रातून 21 लाख राख्या जाणार - भाजप महिला उपाध्यक्षा रेखा कुलकर्णी
- 3:36 PM यवतमाळ - राष्ट्रीय वैद्यक आयोगाच्या निषेधार्थ जिल्ह्यातील खासगी रुग्णालय पूर्णपणे बंद
- 3:28 PM पुणे -राज्यात जनादेश रॅली काढणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी आधी पाच वर्षापुर्वी दिलेली कुठली आश्वासने पूर्ण केली ते सांगावे. आमचे मुख्यमंत्र्यांना 11 प्रश्न आहेत, त्यांची उत्तरे या जनादेश रॅलीमध्ये द्यावी नाही तर, ज्या मार्गाने मुख्यमंत्री जातील त्या मार्गाने आम्ही जनआक्रोश रॅली काढू, राजू शेट्टीचा इशारा
1.25 pm - सोलापूर -करमाळ्यात बँक ऑफ महाराष्ट्रचा स्लॅब कोसळला, एकाचा मृत्यू, प्रशांत बागल असे मृताचे नाव, 20 जण अडकले
1.00 pm -उन्नाव बलात्प्रकार प्रकरण: अपघातस्थळी सीबीआयचे पथक रवाना, चौकशी सुरु
12.45 PM -मुंबई महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना मिळणार विदेशी भाषेचे धडे
12.30 PM - नागपूर -नागपुरातील नांद नदीच्या पुरात अडकले नागरिक; एनडीआरएफकडून बचाव कार्य सुरू
12.15 PM-कोल्हापूर - राधानगरी धरण 'ओव्हरफ्लो'; स्वयंचलित दरवाज्यातून 1428 क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू
12.00 मुंबई -देशभरातील डॉक्टर आज संपावर; आयएमएने पुकारला बंद
11.45 AM - नाशिक :मराठा हायस्कूलमध्ये लोखंडी कपाट अंगावर पडून विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू
11.30 AM - मुंबई -आमची युती अभेद्य, निवडणूक एकत्रच लढवणार - मुख्यमंत्री
11.00 AM -मुख्यमंत्र्यांच्या चाणक्य नितीचा पवारांना धक्का, शिवेंद्रराजे, वैभव पिचड, संदिप नाईकांच्या हातात कमळ
10.22 AM - वर्धा - जिल्ह्यात पावसाचा कहर, ६ तालुक्यात अतिवृष्टी, वरुड - आष्टी रस्त्यावरील पूल गेला वाहून