मुंबई - वांद्रे स्थानकाच्या बाहेर घरी जाण्याची मागणी करत हजारो कामगार जमल्यानंतर चांगलाच गदारोळ निर्माण झाला. या प्रकारावरून भाजप नेत्यांनी राज्य सरकारच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद फडणवीस यांनी या प्रकारावर परराज्यातील मजुरांची व्यवस्था करणे, त्यांना योग्य जेवण, सुविधा देणे, ही राज्य सरकारची जबाबदारी आहे, असे म्हटले आहे.
वांद्र्यातील जमावावरून राजकीय आरोप-प्रत्यारोप - महाराष्ट्र सरकार
परराज्यातील लोकांना त्यांच्या घरी जाण्याची व्यवस्था करण्यात केंद्र सरकार कमी पडले. अशा लोकांना अन्न, निवारा नको आहे, त्यांना त्यांच्या घरी परतायचे आहे, असे म्हणत मंत्री, शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी केंद्र सरकारवर टीका केली.
परराज्यातील लोकांना त्यांच्या घरी जाण्याची व्यवस्था करण्यात केंद्र सरकार कमी पडले. अशा लोकांना अन्न, निवारा नको आहे, त्यांना त्यांच्या घरी परतायचे आहे, असे म्हणत मंत्री, शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी केंद्र सरकारवर टीका केली. याविषयी फडणवीस यांनी, अशा स्थितीत आपली जबाबदारी झटकत केंद्र सरकारवर टीका करून पळ काढला जात असेल तर ते आणखी दुर्दैवी आहे. कोरोनाविरूद्धचा लढा हा राजकीय नाही, हे कृपया आतातरी लक्षात घ्या, असे म्हटले आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ३ मे पर्यंत लॉकडाउन वाढवत असल्याचे सकाळी जाहीर केले. त्यानंतर सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळून आलेल्या मुंबईत हजारोच्या संख्येने कामगार रस्त्यावर आले. वांद्रे स्थानकाबाहेर कामगारांची गर्दी झाल्याने पोलिसांची प्रचंड धावपळी झाली. मोठ्या शर्थीने पोलिसांनी जमावाला पांगवले.