महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

काका पाठोपाठ पुतण्याचाही कार्यकर्त्यांना वाढदिवस साजरा न करण्याचे आवाहन - मनसे प्रमुख राज ठाकरे न्यूज

मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला होता. कार्यकर्त्यांनी शुभेच्छा देण्यासाठी घरी येऊ नये, असे आवाहन त्यांनी केलं होते. काकांच्या पावलावर पाऊल टाकत पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी देखील शिवसैनिकांना आवाहन केलं आहे.

काका पाठोपाठ पुतण्याचाही कार्यकर्त्यांना वाढदिवस साजरा न करण्याचे आवाहन
काका पाठोपाठ पुतण्याचाही कार्यकर्त्यांना वाढदिवस साजरा न करण्याचे आवाहन

By

Published : Jun 12, 2021, 5:26 PM IST

मुंबई -मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला होता. कार्यकर्त्यांनी शुभेच्छा देण्यासाठी घरी येऊ नये, असे आवाहन त्यांनी केलं होते. काकांच्या पावलावर पाऊल टाकत पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी देखील शिवसैनिकांना आवाहन केलं आहे. यंदा माझ्या वाढदिवसानिमित्त कोणताही कार्यक्रम, सोहळा करण्याचे टाळत आहे. आपण मला प्रत्यक्ष भेटण्यासाठी येऊ नये, अशी विनंती आदित्य यांनी केली आहे.

१३ जूनला पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचा वाढदिवस असतो. त्यानिमित्ताने अनेक कार्यकर्ते त्यांना भेटायला येत असतात. मात्र, यंदा करोनाच्या पार्श्वभूमीवर वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय आदित्य ठाकरेंनी घेतला आहे. ट्टिवरवर एक पोस्ट शेअर करत त्यांनी हा निर्णय जाहीर केला आहे.

आदित्य ठाकरे यांनी केलेले आवाहन
मागील वर्षापासून आपण कोरोनाच्या महासंकटाशी लढत आहोत आणि आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळेच हे शक्य झाले. आपल्याला आता संभाव्य तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी सज्ज व्हायचे आहे. मास्क लावणे, अंतर पाळणे, गर्दी होऊ न देणे हा या आजाराला हरवण्याचा हमखास उपाय आहे. त्यामुळेच यंदा माझ्या वाढदिवसानिमित्त कोणताही कार्यक्रम, सोहळा करण्याचे टाळत आहे, असं आदित्य यांनी म्हटलं आहे.

माझी आपणा सर्वांना हीच विनंती आहे की, कृपया कुठेही गर्दी करु नका. आपण मला प्रत्यक्ष भेटण्यासाठी येऊ नये, ही नम्र विनंती. आपण प्रत्यक्ष भेटला नाहीत तरी आपणा सर्वांच्या शुभेच्छा, प्रेम, आशीर्वाद माझ्यासोबत आहेतच आणि त्या कायम राहतील, हा विश्वासही आहे. वाढदिवसानिमित्त होर्डिंग्स, हार, केक अशा गोष्टींवर खर्च करू नये, असेही मला मनापासून वाटते. त्याऐवजी कोरोनाला हरवण्यासाठीचे नियम पाळणे, इतरांना शक्य ती मदत करणे हीच वाढदिवसाची अमूल्य भेट. घरी रहा, सुरक्षित रहा, असं आवाहन त्यांनी केलं आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details