प्रतिक्रिया देताना आमदार आदित्य ठाकरे मुंबई - महापालिकेतील कार्यालयात मुंबईच्या पालकमंत्र्यांना कॅबिन कशाला? असा प्रश्न आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला आहे. मुंबई शहराचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांना मुंबई महापालिकेत कॅबिन उपलब्ध करून दिले आहे. 24 तासाच्या आत कॅबिन रिकामी केली नाही तर मुंबईकर आपला राग दाखवतील, असा इशारा देत राज्यातील महापौरांना देखील मंत्रालयात कॅबिन द्यावी, अशी मागणी आदित्य ठाकरे यांनी केली आहे.
आदित्य ठाकरेंचा इशारा -गेल्या अनेक महिन्यापासून मुंबई महापालिकेतील सर्व पक्षांचे कार्यालये आणि समिती कार्यालये बंद आहेत. त्यातच मुंबईचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांना बीएमसीत कॅबिन दिल्यामुळे ठाकरे गट आक्रमक झाला आहे. आदित्य ठाकरे म्हणाले की, राज्यातील प्रत्येक महापौरांना मंत्रालयात एक कॅबिन द्यावी आणि आमदार म्हणून आम्हाला मुंबई महापालिकेत एक कॅबिन देण्यात यावी. पक्ष कार्यालय बंद करून आता हे हुकूमशाही पद्धतीने तिथे घुसखोर म्हणून जात आहेत आणि मुंबईवर हुकूमशाही चालवण्याचा प्रयत्न करत आहेत. हे जर 24 तासाच्या आत थांबले नाही तर मुंबईकर राग व्यक्त करतील, असा इशारा आदित्य ठाकरे यांनी दिला आहे.
राज्यातील प्रत्येक महापौरांना मंत्रालयात एक कॅबिन द्यावी आणि आमदार म्हणून आम्हाला मुंबई महापालिकेत एक कॅबिन देण्यात यावी - आदित्य ठाकरे, आमदार, ठाकरे गट
कोविड सेंटर घोटाळ्याप्रकरणी लवकरच आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांची जेलवारी फिक्स आहे - नितेश राणे, आमदार, भाजप
कुठे गेली तुमची देशभक्ती - मणिपूरमधील प्रश्नावर सभागृहात बोलू दिले नाही. यामधील एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. ज्या दोन-तीन महिलांवर अत्याचार झाला त्यातील एका महिलेचे पती कारगिल युद्धात लढलेले सुभेदार आहेत. त्यांच्यावर जर असे अत्याचार होत असतील तर कुठे गेली तुमची देशभक्ती? कुठे गेला तुमचे देशप्रेम? असा प्रश्न आदित्य ठाकरे यांनी भाजपला विचारला आहे. देशाचे नागरिक म्हणून तुम्हाला या प्रकरणाचा संताप आला पाहिजे. गेल्या दोन महिन्यापासून मणिपूरमध्ये हिंसाचार सुरू आहे. त्यामुळे भारताची जगात बदनामी होत आहे. सरकार बरखास्त करून राष्ट्रपती राजवट लागू करा, अशी मागणी आदित्य ठाकरे यांनी केली आहे.
प्रतिक्रिया देताना आमदार नितेश राणे नितेश राणेंची टीका - घाबरलेले आणि लवकरच जेलची वारी करणारे संजय राऊत सकाळी येऊन कोविड घोटाळा कसा झाला नाही. कोविड सेंटर त्यांनी किती चांगले चालवले, तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी किती चांगले काम केले याचे ज्ञान देत होते. कोविडमध्ये राज्याची बदनामी झाली. देशात महाराष्ट्रात सर्वात जास्त रुग्ण होते. कोविड काळात चांगली सुविधा का देऊ शकले नाहीत याचे कारण आता आम्हाला कळाले आहे. उद्धव ठाकरे आणि त्यांची गँग कोविडमध्ये भ्रष्टाचार करण्यात व्यस्त होती, असा आरोप भाजप आमदार नितेश राणे यांनी केला आहे. संजय राऊत कितीही बोंबलेतरी त्यांची अर्थ रोडमध्ये वारी फिक्स झाली आहे. मुंबईत होणाऱ्या विरोधकांच्या बैठकीपूर्वी संजय राऊत आणि आदित्य ठाकरे मुंबईच्या बैठकीत दिसणार नाहीत, असेही राणे यावेळी म्हणाले. संजय राऊत आणि आदित्य ठाकरे जेलमध्ये बसून, तू का मी कोणी मोठा घोटाळा केला? यावर दगड उडवत असतील, असा दावा नितेश राणे यांनी केला आहे.
हेही वाचा -
- Heatstroke Death Case : उष्माघात मृत्यू प्रकरण; विरोधकांकडून 'या' मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी, सरकारने मांडली 'ही' बाजू
- Asim Sarode On Manipur Violence : महिलांना विवस्त्र केल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालय समिती नेमण्याची शक्यता - असीम सरोदे
- Sanjay Raut criticizes Modi : मणिपूर हिंसाचारावर बोलायला 56 दिवस का लागले? पंतप्रधान मोदींचा काहीतरी राजकीय स्वार्थ - संजय राऊत