महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Aaditya Thackeray : 'शासकीय रुग्णालय' मृत्यूचा सापळा बनलाय का? आदित्य ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल

Aaditya Thackeray : नांदेड आणि छत्रपती संभाजीनगरमधील रुग्णालयात अनेक रुग्ण मागील दोन दिवसात दगावले आहेत. यावरुन आता राजकीय वातावरण तापलंय. या घटनांवरुन ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली.

Etv Bharat
Etv Bharat

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 3, 2023, 5:48 PM IST

मुंबई : Aaditya Thackeray : नांदेडच्या शासकीय रुग्णालयात ४८ तासांत ३१ रुग्णांचा मृत्यू (Nanded Hospital Death Case) झाल्यानं सर्वत्र खळबळ उडाली आहे. ही घटना ताजी असतांनाच आता छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील अशीच घटना घडल्याचं (Sambhajinagar Hospital Death Case) समोर आलंय. छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयात २ नवजात बालकांसह १८ जणांचा मृत्यू झालाय. दरम्यान, या दोन्ही घटनांवरून आता राज्यातील शिंदे सरकारवर विरोधकांकडून टीका करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर आता शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी राज्य सरकारला घेरलंय.

आदित्य ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल : या संदर्भात आदित्य ठाकरे यांनी 'एक्स'वर पोस्ट शेयर केली आहे. यात ते म्हणाले की, कालच नांदेडच्या शासकीय रुग्णालयात मृत्यूचं थैमान झाल्याची भीषण धटना घडली असताना, आज तसाच भयानक प्रकार छत्रपती संभाजीनगरमधल्या घाटी रुग्णालयात घडल्याचं समोर येतंय. २ बालकांसह १८ जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. नांदेडच्या रुग्णालयातही अजून ७ मृत्यू झाल्याचं समजतंय. हे सगळं भयानक आहे. तसेच शासकीय रुग्णालय हा मृत्यूचा सापळा बनलाय का? अशी शंका येतेय, असा टोलाही त्यांनी लगावला.

मिंधे-भाजपाला सत्तेत बसण्याचा अधिकार नाही : महाराष्ट्रातली आरोग्य व्यवस्था या भ्रष्ट मिंधे-भाजपा सरकारच्या काळात कोलमडून गेल्याचं ढळढळीतपणे दिसतंय. लोकांच्या जीवाची यांना पर्वा नाही, परिस्थितीचं गांभीर्य नाही... अशांना सत्तेच्या खुर्चीत बसून महाराष्ट्र सांभाळण्याचा हक्कच नाही, असं म्हणत आदित्य ठाकरेंनी शिंदे सरकारवर जोरदार टीका केली आहे.

हेही वाचा -

  1. Nanded Patient Death Case : रुग्णालयात मृत्यूचं तांडव, सत्ताधारी खासदारानं रुग्णालयाच्या डीनला साफ करायला लावलं शौचालय
  2. Ghati Hospital Death Case : नांदेडनंतर संभाजीनगरच्या 'घाटी' रुग्णालयात मृत्यूचं तांडव, २४ तासात १८ रुग्ण दगावले
  3. Raj Thackeray On Nanded Death Case : तीन तीन इंजिन लाऊन राज्यातील आरोग्य यंत्रणा व्हेंटिलेटरवर, राज ठाकरेंची खोचक टीका

ABOUT THE AUTHOR

...view details