मुंबई - आदित्य ठाकरे यांनी प्रामुख्याने तीन मुद्द्यावर स्पष्टीकरण मुख्यमंत्र्यांकडे स्पष्टीकरण मागितले आहे. मुख्यमंत्री आणि नगरविकास मंत्री यांनी आपल्याला चर्चेसाठी बोलावून विचारलेल्या वरील '३' प्रश्नांचे स्पष्टीकरण द्यावे ,असे आव्हान आदित्य ठाकरे यांनी दिले आहे.
Aaditya Thackeray On CM : मुंबईतील रस्त्यांच्या काँक्रेटीकरणावरून आदित्य ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांना पुन्हा सवाल - आदित्य ठाकरेंची मुख्यमंत्री शिंदेंवर टीका
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईतील ४०० किलोमीटरचे रस्ते काँक्रीटीकरण करण्यासाठी निविदा मागवल्या. या निविदांमध्ये घोटाळा असल्याचा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी केला होता. मुंबई महापालिकेत लोकप्रतिनिधी महापौर नसताना अश्या निविदा काढता येतात का? असा प्रश्न आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला. त्यानंतर या निविदा प्रक्रियेत महापालिकेने आदित्य ठाकरेंनी उपस्थित केलेल्या प्रश्नांवर स्पष्टीकरण दिले. मात्र, त्या नंतरही आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री यांना या संबंधी काही प्रश्न विचारले आहेत.
१) व्यावहारिक आणि संभाव्य स्केल'
२) मोठा घोटाळा
३) टोळधाड 'सेटिंग'
(१) कंत्राटदारांनी नवीन अंदाजित किमतीनुसार बोली न लावता सुधारित SOR पेक्षा सरासरी ८% जास्त बोली का आणि कशी लावली ?
(२) आजपर्यंत GST हा स्वतंत्रपणे कधीच मोजला गेला नाही. असे असतानादेखील कंत्राटदारांना ६६% वाढीव देवके देऊन GST वेगळा का लावण्यात आला ?
(३) फक्त ५ बोलीदारांनीच अर्ज कसा केला आणि त्या सर्वांना प्रत्येकी एक एक निविदा कश्या मिळाल्या? आधीच ठरविल्याप्रमाणे बोलीदारांनी बोली लावली, ही एक प्रकारची टोळधाड (कार्टेलायझेशन) नाही का?
(४) मुंबई महानगरपालिकेने नमूद केल्याप्रमाणे कोणत्या नगरसेवकांनी या रस्त्यांचे काँक्रीटीकरण करण्याचे सुचविले? ऑगस्ट महिन्यात आणि आता निविदा काढल्या गेल्या तेव्हा. नगरसेवकांचा कार्यकाळ संपल्याने ते कार्यरत नव्हते. त्यामुळे मुंबई महानगरपालिका नेमका कोणत्या नगरसेवकांचा उल्लेख करत आहे? तसेच निवडलेल्या ४०० किमी रस्त्यासंदर्भातील नगरसेवकांची विनंती पत्रे आम्ही पाहू शकतो का?
(५) राष्ट्रीय अनुभव असलेल्या या कंत्राटदारांनी मुंबईसारख्या इतर शहरात कुठे आणि कोणत्या दराने काम केले आहे? मुंबईसारख्या इतर कोणत्या शहरात सगळे कॉक्रिटचे रस्ते आहेत?
(६) मुंबई महानगरपालिकेच्या प्रतिसादात नमूद केल्याप्रमाणे २४ महिन्यांचा (पावसाळा वगळता) कालावधी ४०० किमी रस्त्यांच्या (काँक्रीटीकरणा) साठी लागणार आहे. प्रत्यक्षात हे काम ३२ महिन्यापर्यंत चालते. काँक्रीट क्यूरिंग टाइम आणि ट्रैफिक मॅनेजमेंटसाठी लागणाऱ्या कालावधीचा हिशोब या प्रतिसादामध्ये धरला गेला आहे का ? ही रस्त्यांची मेगा कॉन्ट्रॅक्ट्स खोके सरकारच्या फायद्यासाठी तयार केली गेलीत का? असे आदित्य ठाकरे यांनी पत्र लिहून प्रश्न उपस्थित केले आहेत.
सरकार पडणार असल्याचा दावा : बाळासाहेब ठाकरे यांचे सुपुत्र उद्धव ठाकरे यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देताच सर्व आमदार टेबलवर चढून नाचले ही यांची विकृती असल्याचे टीका आदित्य ठाकरे यांनी केली. गद्दारांनी आम्हाला हिंदुत्व शिकवू नये, मनात राम आणि हाताला काम हे आमचे मत आहे, असे देखील यावेळी आदित्य ठाकरे यांनी सांगितले. त्याचप्रमाणे हे सरकार नक्की पडणार आणि चाळीस आमदारांना या सरकारने विहारच दिला आहे असे देखील वक्तव्य आदित्य ठाकरे यांनी केले. तर अनेकजण दावोसला जाता जाता लटकले आणि झाकली मूठ सव्वा लाखाची अशाप्रकारे दाखवत आहेत, अशी टीका अरविंद सावंत यांनी केली.