महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'एमआयएम'ने जाती-धर्मांत भांडणे लावण्याचे कुकर्म केले -आदित्य ठाकरे - bhaykhala assembly news

भायखळा विधानसभा मतदार संघातील शिवसेनेच्या उमेदवार यामिनी जाधव यांच्या प्रचारासाठी आगरीपाडा येथील झुला मैदानात शिवसेनेच्या इतिहासातील पहिली सभा झाली.

आदित्य ठाकरे

By

Published : Oct 17, 2019, 2:35 PM IST

मुंबई - सत्ता असो वा नसो शिवसेना ३६५ दिवस शाखांमधून कामे करते. मात्र एमआयएमने जाती-धर्मांत भांडणे लावण्याचे कुकर्म केले आहे. त्यामुळे आता येथील नागरिकांना शिवसेना-भाजप-आरपीआय महायुतीशिवाय पर्याय नाही, असे आदित्य ठाकरे म्हणाले.

आदित्य ठाकरे

हेही वाचा-पुण्यात मेट्रोपेक्षा वॉटर ट्रान्सपोर्ट प्रकल्प महत्वाचा - प्रकाश आंबेडकर

भायखळा विधानसभा मतदार संघातील शिवसेनेच्या उमेदवार यामिनी जाधव यांच्या प्रचारासाठी आगरीपाडा येथील झुला मैदानात शिवसेनेच्या इतिहासातील पहिली सभा झाली. यावेळी आदित्य ठाकरे बोलत होते. याप्रसंगी केंद्रीय मंत्री अरविंद सावंत, माजी आमदार सचिन अहिर, स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.

भायखळ्याला खरा 'वारीस' देणार
एमआयएमचे आमदार वारीस पठाण यांनी, कोणतीही विकासकामे न करता भायखळा मतदारसंघाला बेवारस करुन सोडून दिले. मात्र, आता मतदारांनी शिवसेनेच्या यामिनी जाधव यांना विजयी करुन या मतदारसंघाला खरा वारस मिळवून द्यावा, असे आवाहन केंद्रीय अवजड उदयोग मंत्री व शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी यावेळी केले.

मदनपुऱ्यासह भायखळ्याचा विकास
भायखळ्याच्या एका बाजूला आम्ही नगरसेवक म्हणून मोठ्या प्रमाणात विकास घडवून दाखवला आहे. मात्र दुसरीकडे ज्यांना आपण निवडून दिले त्यांनी ५ वर्षात काहीच कामे केली नाहीत. मात्र आता शिवसेनेच्या यामिनी जाधव यांना विजयी करा त्या या मदनपुऱ्यासह संपूर्ण भायखळ्याचा विकास केल्याशिवाय राहणार नाहीत, असे प्रतिपादन स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी केले.

ABOUT THE AUTHOR

...view details