मुंबई:राज्यांमधील प्रत्येक विद्यार्थ्याचे नाव आणि आधार सकट त्याची माहिती 'सरल' संकेतस्थळावर जोडली गेली पाहिजे, असा नियम शिक्षण विभागाने घालून दिला होता. याची जोडणी करण्याची मुदत 30 एप्रिल पर्यंत होती; मात्र ती वाढवून 15 मे पर्यंत करण्यात आली आहे. तरीही तांत्रिक चुका असल्यास मुलांचे शाळा प्रवेश नाकारू नये. आधारमध्ये काही तांत्रिक बाबी असतील तर त्या दूर कराव्या, असे निर्देश शासनाने दिले आहेत.
'हे' आहे आधार जोडणीचे कारण?महाराष्ट्रात मागील वर्षी इयत्ता पहिली ते दहावीत 2 कोटी 25 लाख विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला. यामध्ये शासन व्यवस्थापनाच्या तसेच खासगी, अनुदानित परंतु सरकारी अनुदान मिळणाऱ्या व्यवस्थापनाच्या आणि विनाअनुदानित व्यवस्थापनाच्या अशा तीन प्रकारे शाळा आहेत. यामध्ये प्रत्येक शाळेला आपल्या इयत्तेत किती विद्यार्थी आहेत आणि त्या प्रत्येकाचे आधार आहे का, याची पडताळणी करून ते कार्ड शासनाच्या सरल प्रणालीमध्ये जोडावे लागते. हे जोडताना प्रत्येकाचे आधार क्रमांक, त्याचा आधार कार्ड आणि त्याच्या बोटांचे ठसे हे जोडले गेले तर जोडणी अंतिमतः खात्रीपूर्वक होते. अन्यथा तो विद्यार्थी गणला जात नाही. कोरोना महामारीमुळे तेव्हापासून संख्या मान्यता आणि आधार जोडणी झालेली नव्हती. त्यामुळे जर शिक्षक भरती करायचे तर विद्यार्थी पठावर किती आहेत ते समजले पाहिजे. ते आधार जोडणीमधून कळते आणि त्यानंतर संच मान्यता होते.
शिक्षण संचालकांचे निर्देश:शासनाने ऑनलाइन सरल प्रणालीवर विद्यार्थ्यांचा आधार क्रमांक आणि त्याचे आधारवरील नाव हे जोडणी करण्यासाठी 15 मे पर्यंत मुदत दिली होती. ती उद्या संपत आहे; परंतु मुलांचे शाळा प्रवेश तांत्रिक कारणावरून कोणताही परिस्थितीत मुलांचे शाळा प्रवेश रोखू नये, असे निर्देश राज्याचे शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी दिले आहे.