महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कोरोना व्हायरस: 'रेमडेसिवीर'साठी यापूढे आधार कार्ड सक्तीचे...

रेमडेसिवीर औषधाचा मोठ्या प्रमाणावर काळाबाजार होत असल्याच्या बातम्या गेले काही दिवस प्रसारीत होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर रेमडेसिवीर औषधासाठी आधारकार्ड सक्तीचे करण्यात आले आहे.

aadhar-card-mandatory-for-remadesivir-in-mumbai
'रेमडेसिवीर'साठी यापूढे आधार कार्ड सक्तीचे...

By

Published : Jul 10, 2020, 1:22 PM IST

मुंबई- कोविड-१९ च्या उपचारांसाठी तयार करण्यात आलेल्या रेमडेसिवीर औषधासाठी आधारकार्ड सक्तीचे करण्यात आले आहे. तशा सूचना मुंबई शहरचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी अन्न आणि औषध प्रशासनाच्या आयुक्तांना गुरुवारी दिल्या आहेत.

'रेमडेसिवीर'साठी यापूढे आधार कार्ड सक्तीचे...
रेमडेसिवीर औषधाचा मोठ्या प्रमाणावर काळाबाजार होत असल्याच्या बातम्या गेले काही दिवस प्रसारीत होत आहेत. या पार्श्वभूमीवर अस्लम शेख म्हणाले की, यापुढे रेमडिसिवीर औषधासाठी रुग्णांना आधारकार्ड दाखविणे बंधनकारक करण्यात आलेले आहे. ज्या रुग्णांना रेमडेसिवीर औषधाचा डोस देण्यात आला आहे त्या रुग्णांची नोंद त्यांच्या आधारकार्डसह ठेवणंही रुग्णालयांना बंधनकारक असेल. तसेच रेमडेसिवीर औषधाचा काळाबाजार करणाऱ्यांवरही कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details