महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Aadesh Bandekar : सिद्धिविनायक मंदिर न्यास समितीत शिंदे गटाचा शिरकाव, आदेश बांदेकरांना अध्यक्षपदावरून हटवलं - सिद्धिविनायक मंदिर न्यास समिती

Aadesh Bandekar : प्रसिद्ध अभिनेते आदेश बांदेकर यांची सिद्धिविनायक मंदिर न्यासाच्या अध्यक्षपदावरून उचलबांगडी करण्यात आली आहे. त्यांच्या जागी शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांची नियुक्ती करण्यात आली.

Aadesh Bandekar
Aadesh Bandekar

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 7, 2023, 5:25 PM IST

मुंबई Aadesh Bandekar : मुंबईत शिवसेनेच्या शिंदे गटानं ठाकरे गटावर पुन्हा एकदा कुरघोडी केली आहे. सुप्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिर न्यास समितीत गेल्या कित्येक वर्षापासून ठाकरे गटाचा बोलबाला होता. मात्र आता येथे शिंदे गटानं शिरकाव केला आहे. सिद्धिविनायक मंदिर न्यास अध्यक्षपदी शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांची नियुक्ती करण्यात आली. प्रसिद्ध अभिनेते आदेश बांदेकर यांच्या जागी सरवणकरांची वर्णी लागली आहे.

आदेश बांदेकर यांना धोबीपछाड : अभिनेते आदेश बांदेकर गेल्या अनेक वर्षांपासून सिद्धिविनायक मंदिर न्यास समितीच्या अध्यक्षपदी होते. मात्र त्यांना धोबीपछाड देत आता आमदार सरवणकरांनी अध्यक्षपदावर ताबा मिळवलाय. यामुळे आता पक्ष, धनुष्यबाण चिन्ह तसंच वेगवेगळ्या शाखा आणि संस्था यांचा ताबा मिळवल्यानंतर सिद्धिविनायक मंदिर न्यास अध्यक्षपदी देखील शिंदे गटानं बाजी मारल्यानं ठाकरे गटाची कोंडी होताना दिसते आहे.

सदा सरवणकर मुख्यमंत्र्यांच्या जवळचे : आमदार सदा सरवणकर हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या जवळचे मानले जातात. गेल्यावर्षी मंत्रीमंडळ विस्तारात त्यांना मंत्रीपद मिळणार असल्याचीही चर्चा होती. मात्र गणेशोत्सवादरम्यान दोन गटातील राड्यात हवेत गोळीबार झाल्या प्रकरणी सरवणकर अडचणीत सापडले होते. मात्र चौकशीअंती त्यांना क्लिन चीट देण्यात आली. या प्रकरणावरून विरोधकांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली होती.

कोण आहेत सदा सरवणकर :

  • सरवणकर सर्वप्रथम शिवसेनेच्या तिकिटावर नगरसेवक म्हणून निवडून आले.
  • शिवसेनेत त्यांनी विभागप्रमुख, स्थायी समिती अध्यक्ष अशी महत्त्वाची पदं भूषवली.
  • २००४ मध्ये ते पहिल्यांदा शिवसेनेच्या तिकीटावर आमदार झाले.
  • मात्र २००९ मध्ये तिकीट न मिळाल्यामुळे त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
  • २०१२ मध्ये सरवणकरांनी शिवसेनेत घरवापसी केली.
  • २०१४ आणि २०१९ मध्ये ते सलग दोन टर्म आमदार म्हणून निवडून आले.
  • २०२२ मध्ये शिवसेनेत फूट पडल्यानंतर ते एकनाथ शिंदेच्या गटात सामिल झाले.

हेही वाचा :

  1. Mukesh Ambani Threat Case : क्रिकेटर शादाब खानच्या नावानं मुकेश अंबानींना धमकी, आरोपीला क्रिकेटच्या मैदानावर सुचली कल्पना
  2. Shambhuraj Desai on Chhagan Bhujbal : छगन भुजबळ समाजात निर्माण करताहेत संभ्रम - शंभूराज देसाई
  3. GramPanchayat Election : कराड उत्तरमध्ये शरद पवार गटाचा डंका, सातारा जावळीत भाजपाची तर पाटणमध्ये शिंदे गटाची घोडदौड

ABOUT THE AUTHOR

...view details