मुंबई - एक छायाचित्र एक हजार शब्दांची बरोबरी करते, असे म्हणतात. त्यामुळे फोटोग्राफीकडे एक गंभीर कला म्हणून पाहिले जाते. मुंबईच्या आकाश कुंभार नावाच्या तरुणाने फोटोग्राफीत विश्वविक्रम केला आहे. त्याने एका दिवसात २७४ मॉडेल्सचे २१६७ छायाचित्र काढले आहेत. हे करणारा तो जगातील पहिला फोटोग्राफर ठरला आहे.
एका दिवसात २७४ मॉडेल्सला कॅमेऱ्यात कैद करत तरुणाचा विश्वविक्रम - mumbai
१२ जानेवारीला सकाळी १० वाजून ३० मिनिटानी आकाशने फोट घेण्यास सुरुवात केली. संध्याकाळी ८ वाजून ३० मिनिटांनी त्याने त्याचे उदिष्ट पूर्ण केले. २७४ फिटनेस मॉडेल्सचे २१६७ फोटो त्याने काढले.
१२ जानेवारीला सकाळी १० वाजून ३० मिनिटानी आकाशने फोट घेण्यास सुरुवात केली. संध्याकाळी ८ वाजून ३० मिनिटांनी त्याने त्याचे उदिष्ट पूर्ण केले. २७४ फिटनेस मॉडेल्सचे २१६७ फोटो त्याने काढले. यासाठी त्याला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. याआधीही आकाशने ग्लॅमर आणि स्पोर्ट जगतातल्या मॉडेल्ससाठी फोटोशूट केले आहे. २०१८ मध्ये एशिया आणि मिडल ईस्टच्या वॉव अॅवार्ड्सने आकाशचा आउटस्टॅन्डिंग फॅशन फोटोग्राफर हा पुरस्कार देऊन सन्मान केला होता. 'बी' या आंतरराष्ट्रीय लाईफस्टाईल मॅगजीनच्या कव्हरपेजसाठी तिनदा फोटोशूट करण्याचा अनुभव आकाशच्या नावावर आहे.
आकाश २०१२ पासून काम करत आहे. अनेक आंतरराष्ट्रीय किर्तीच्या मॉडेल्ससाठी त्याने फोटोशूट केले आहे. पण, एका दिवसात २७४ मॉडेल्सचे फोटो काढणे आव्हानात्मक होते, असे आकाश सांगतो. भारतात. फिटनेस फोटोग्राफीविषयी जागरुकता नाही अशी खंतही तो बोलून दाखवतो. फोटोग्राफीकडे व्यवसायिकदृष्टीने न पाहता, कलात्मक माध्यमातून पाहावे अशी त्याची इच्छा आहे. आकाशला गिनीज बुकात नाव नोंदवण्याची इच्छा आहे.