नवी मुंबई - हार्बर रेल्वे मार्गावरून सीएसएमटी ते पनवेल लोकलमधून प्रवास करणाऱ्या एका तरुणाला लुटल्याची घटना घडली आहे. पाच जणांच्या टोळीने सीवूड्स ते बेलापूरदरम्यान धावत्या लोकलमध्ये बेदम मारहाण करून त्याच्याजवळची रोख रक्कम, एटीएम कार्ड व इतर वस्तू लुटून पलायन केले. पनवेल रेल्वे पोलिसांनी या प्रकरणातील टोळीविरोधात दरोड्याचा गुन्हा दाखल करून त्यांना २४ तासात अटक देखील करण्यात आली आहे.
या घटनेतील तक्रारदार तरुण मोहम्मद आरिफ शेख असे असून तो धारावी परिसरात राहतो. मोहम्मदचा नवी मुंबईतील मित्र राहुल मंडल याला मोबाईल देण्यासाठी मोहम्मद सोमवारी पहाटे लोकलने जात होता. यासाठी त्याने पहाटे ४.५५ची जीटीबी रेल्वे स्थानकातून पनवेल लोकल पकडली होती. सदर लोकल कुर्ला रेल्वे स्थानकात आल्यानंतर मोहम्मद बसलेल्या मालडब्यात २० ते २२ वयोगटातील पाच तरुण चढले. त्यातील एकाने मोहम्मदकडे पैशाची मागणी केली. त्यानंतर लोकल सीवूड्स रेल्वे स्थानकात आल्यानंतर या पाच जणांनी मोहम्मदला धमकावून त्याच्याकडे ५०० रुपयांची मागणी करण्यास सुरुवात केली. मोहम्मदने पैसे देण्यास नकार दिल्यानंतर त्यातील दोघांनी त्याला पाठीमागून पकडून ठेवले. त्यानंतर इतरांनी त्याच्या छातीवर वा तोंडावर बेदम मारहाण करून त्याच्या खिशातील ३५० रुपये व त्याचे एटीएम कार्ड तसेच कामाचे ओळखपत्र काढून घेतले.
तरुणाला लुटणारी टोळी 24 तासात गजाआड, पनवेल रेल्वे पोलिसांची कारवाई - navi mumbai theft news
हार्बर रेल्वे मार्गावरून सीएसएमटी ते पनवेल लोकलमधून प्रवास करणाऱ्या एका तरुणाला लुटल्याची घटना घडली आहे. पाच जणांच्या टोळीने सीवूड्स ते बेलापूरदरम्यान धावत्या लोकलमध्ये बेदम मारहाण करून त्याच्याजवळची रोख रक्कम, एटीएम कार्ड व इतर वस्तू लुटून पलायन केले.
नवी मुंबई तरुणाला लुटले