मुंबई- इमारतीच्या लिफ्ट व भिंत यांच्यामध्ये अडकून घरकाम करणार्या महिलेचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी मुंबईतील कुलाबा परिसरातील नौदल वसाहतीत घडली.
मुंबईत लिफ्टमध्ये अडकून महिलेचा मृत्यू - लिफ्टमध्ये अडकून महिलेचा मृत्यू
इमारतीच्या लिफ्टमध्ये अडकून महिलेचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी मुंबईतील कुलाबा परिसरातील नौदल वसाहतीत घडली.
![मुंबईत लिफ्टमध्ये अडकून महिलेचा मृत्यू](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-4830062-thumbnail-3x2-mum.jpg)
प्रातिनिधीक छायाचित्र
आरती परदेशी (वय 45 वर्षे), असे मृत महिलेचे नाव आहे. सोमवारी दुपारी बारा वजाण्याच्या दरम्यान आरती ही घरकाम करत असलेल्या एका फ्लॅटमधील पाळीव कुत्र्याला घेऊन बाहेर फिरायला जात होती. दरम्यान, लिफ्ट आणि भिंत यामध्ये अडकून दुर्घटना घडली. पोलिसांनी तातडीने आरतीला जखमी अवस्थेत नजीकच्या रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचार सुरू असताना आरती परदेशी हिचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी कफ परेड पोलिसांनी मृत्यूची नोंद केली आहे.