महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

चुनाभट्टी येथे मद्यधुंद कार चालकाची पादचाऱ्यांना धडक; 19 वर्षीय तरूणीचा मृत्यू - archana parathe accident chunabhatti

अर्चना इतर दोन महिलांसह रात्री 8.45च्या सुमारास बाजारातून परत येत होती. या तिघींना साईबाबा मंदिराजवळ एमएच 05 बीजे 3920 क्रमांकाच्या कारने मागून धडक दिली. धडकेनंतर अर्चना स्वदेशी मिल चाळ नंबर 113 पर्यंत गाडीसोबत फरफटत गेली. यानंतर तिचा जागीच मृत्यु झाला. गाडी चालवत असताना चालकाने मद्यप्राशन केले असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.

accident
मृत अर्चना पारठे

By

Published : Dec 7, 2019, 11:55 AM IST

Updated : Dec 7, 2019, 1:01 PM IST

मुंबई - चुनाभट्टी येथील धावजी केणी मार्गावरील साईबाबा मंदिराजवळ भरधाव वेगात येणाऱ्या वाहनाने काल रात्री बाजारातून परत येत असलेल्या तीन महिलांना धडक दिली. या घटनेत अर्चना पारठे(वय 19) या तरुणीचा जागीच मृत्यू झाला आहे.

चुनाभट्टी येथे मद्यधुंद कार चालकाची पादचाऱ्यांना धडक

हेही वाचा -भरधाव वाहनाच्या धडकेत एका शेतमजूर महिलेचा जागीच मृत्यू, दोघी गंभीर जखमी

अर्चना इतर दोन महिलांसह रात्री 8.45च्या सुमारास बाजारातून परत येत होती. या तिघींना साईबाबा मंदिराजवळ एमएच 05 बीजे 3920 क्रमांकाच्या कारने मागून धडक दिली. धडकेनंतर अर्चना स्वदेशी मिल चाळ नंबर 113 पर्यंत गाडीसोबत फरफटत गेली. या घटनेत तिचा जागीच मृत्यू झाला. घटनेत एक महिला जखमी झाली आहे. जखमी महिलेला उपचारासाठी दळवी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

याप्रकरणी चालकासह तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. एक आरोपी अद्यापही फरार असून त्याचा शोध सुरू आहे. दरम्यान, चारही आरोपींना अटक केल्याशिवाय तरूणीचा मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचे मुलीच्या नातेवाईकांनी म्हटले आहे. आरोपीच्या अटकेची मागणी करत नातेवाईकांनी चुनाभट्टी पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. गाडी चालवत असताना चालकाने मद्यप्राशन केले असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. घटनेचा पुढील तपास चुनाभट्टी पोलीस करत आहेत.

Last Updated : Dec 7, 2019, 1:01 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details