मुंबई- विक्रोळी रेल्वे स्थानकांवर लोकल येत असल्याचे पाहून रेल्वे रूळावर उडी घेत एका महिलेने आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहेत. संजना अजित शेरे (वय 27 वर्षे) मृत महिलेचे नाव आहे.
सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली घटना
मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी (दि. 8 मे) सकाळी 10.35 च्या सुमारास विक्रोळी रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक 4 वर संजना बराच वेळ बसून होती. काही वेळानंतर भरधाव वेगाने लोकल येत असल्याचे बघताच या तिने रेल्वे रुळावर उडी मारली आणि आपले डोके रेल्वे रुळावर ठेवून झोपली. अवघ्या काही सेकंदात जलद लोकल तिच्या अंगावरून गेली आणि यात तिचा जागीच मृत्यू झाला. हा सर्व प्रकार रेल्वे स्थानकावर लागलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या घटनेची माहिती कुर्ला लोहमार्ग पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. या महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी नेण्यात आला आहे. कुर्ला लोहमार्ग पोलीस या घटनेची चौकशी करत आहेत.