मुंबई -येथील 'गेटवे ऑफ इंडिया'जवळ समुद्रात रविवारी एका बोटीला झालेल्या अपघात ४५ जणांना वाचविण्यात यश आले आहे.
'गेटवे ऑफ इंडिया'जवळील समुद्रात पार्टी करण्यासाठी रविवारी टाइम नावाची बोट ३५ नागरिकांसह १० कर्मचाऱ्यांना घेऊन समुद्रात जात होती. 'गेटवे ऑफ इंडिया'पासून काही अंतर पुढे गेल्यावर अचानक या बोटीत पाणी शिरू लागल्याने बोटीवरील नागरिकामध्ये गोंधळ उडाला. मात्र, सुदैवाने 'एलिफंटा ते गेटवे' अशी प्रवासी बोट चालविणाऱ्या अष्टविनायक या बोटीच्या कर्मचाऱ्यांच्या ही बाब लक्षात आली. त्यांनी तत्काळ बुडणाऱ्या बोटीवरील ४५ नागरिकांना सुरक्षित बाहेर काढले. अचानक बुडणाऱ्या 'टाइम' या बोटीला स्थानिक नाविकांनी त्यांच्या 'इटत' बोटींच्या मदतीने बाहेर काढून 'गेटवे'च्या किनाऱ्यावर आणले आहे.