मुंबई- काल रात्री हार्बर मार्गावरील कुर्ला रेल्वे स्थानकाजवळ मालगाडीचा डब्बा घसरल्याने हार्बर मार्गावरची वाहतूक पूर्णतः ठप्प झाली होती. रात्री उशिरा मालगाडीचा डब्बा बाजूला काढून वाहतूक सुरळीत करण्यात आली आहे.
कुर्ल्यात घसरलेला मालगाडीचा डब्बा बाजूला करण्यात आला; हार्बर मार्ग सुरळीत - Harbor Traffic
रात्री ११.३० वाजेच्या सुमारास एक मालगाडी माहुलच्या दिशेने जात असताना तिचा डब्बा कुर्ला रेल्वे स्थानकाजवळ हार्बर मार्ग क्रॉस करताना घसरला होता. त्यामुळे, पनवेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणारी अप आणि डाऊन सेवा पूर्णतः ठप्प झाली होती.
रात्री ११.३० वाजेच्या सुमारास एक मालगाडी माहुलच्या दिशेने जात होती. त्या दरम्यान मालगाडीचा डब्बा कुर्ला रेल्वे स्थानकाजवळ हार्बर मार्ग क्रॉस करताना घसरला होता. त्यामुळे, पनवेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणारी अप आणि डाऊन सेवा पूर्णतः ठप्प झाली होती. या अपघातामुळे लोकलच्या प्रवाशांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले होते. रात्री २ वाजता हा डब्बा पूर्णतः बाजूला करण्यात रेल्वे प्रशासनाला यश आले असून या मार्गावरील प्रवाशांना ठाण्यावरून प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे. मात्र, सदर घटनेमुळे रात्री कामावर जायला प्रवाशांना उशीर झाला होता. त्याचबरोबर, कुर्ला स्थानकात प्रवाशांची मोठी गर्दीही झाली होती. मालगाडीचा डब्बा बाजूला करण्यात आल्यानंतर आज सकाळपासून हार्बर मार्गावरील रेल्वे सेवा सुरळीत आहे.
हेही वाचा-कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी घेतली माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांची भेट