Mumbai Local Late हार्बर रेल्वे मार्गावरील ट्रेन 15 मिनिटे उशिरा, तांत्रिक बिघाडामुळे वाहतूक विस्कळीत - हार्बर मार्ग सीएसएमटी
सकाळी लोकल उशिरा धावत असल्याने चाकरमान्यांना त्रासाला सामोरे ( Mumbai local issue ) जावे लागत आहेत. हार्बर रेल्वे मार्गावरील ट्रेन 15 मिनिटे उशिरा धावत आहेत. त्यामुळे चाकरमान्यांना कामावर जाण्याकरिता उशीर होणार आहे.
मुंबई : हार्बर मार्गावर सीएसएमटी ते वाशी मार्गावर जुई नगर रेल्वे स्थानकाजवळ सिग्नल बिघाड ( train on the Harbor Railway line ) झाला आहे. त्यामुळे ट्रेन 15 मिनिटे उशिरा धावत आहे. याचा फटका प्रवाशांना बसला आहे.
मध्य रेल्वे ( center railway late in Mumbai ) दर दोन दिवसांनी 10 मिनिटे उशिरा धावते. त्यामुळे प्रवासी त्रस्त झाले आहे. हार्बर मार्गावरदेखील ( technical fault on harbor road ) ही समस्या येऊ लागली आहे.आज सकाळी 6 वाजून 30 मिनिटानंतर जुईनगर रेल्वे स्थनाक दरम्यान तांत्रिक बिघाड झाला. पनवेलकडून सीएसएमटी कडे येणाऱ्या आणि जाणाऱ्या ट्रेन 15 मिनिटे उशिराने धावत आहेत. जुई नगर ते ठाणे येणारे प्रावसी ठाणेपर्यंत येऊन कुर्ला आणि अंधेरी बोरिवली पर्यंत जातात. त्यांना देखील 15 मिनिट उशिरा ट्रेन धावत असल्याने मनस्ताप झाला. तर सीएसएमटीकडे जाणाऱ्या प्रवाशांना देखील कामावर जाण्याकरिता उशीर होणार आहे.
रेल्वे प्रवासी संघटनांचे अमोल कदम यांनी सांगितले की, तांत्रिक बिघाड झाल्याने आज हार्बर मार्गावर सीएसएमटी कडे जाणाऱ्या ट्रेन 15 मिनिट उशिरा धावत आहेत. मुंबईकरांना नेमकं कामावर जाताना ट्रेन उशिरा धावत आहेत.याबाबत रेल्वे अधिकारी ए के सिंग यांच्या सोबत संवाद साधला असता त्यांनी खुलासा केला की, आज सकाळी ६.३० पासून पॉइंट नॉर्मलवर येत नाही. हार्बर मार्गावर सीएसएमटी ते वाशी मार्गावर जुई नगर रेल्वे स्थानका जवळ सिग्नल बिघाड झाला. त्यामुळे ट्रेन 15 मिनिटं उशिरा धावत आहेत. वाशी आणि ट्रान्स हार्बर मार्गावर ठाणे ते नेरूळ दरम्यान सेवा सुरू आहेत. कर्मचारी या समस्येवर काम करत आहेत.