मुंबई : गुरुवारी सायंकाळी ७.३० वाजताच्या सुमारास नवी मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षात आलेल्या एक कॉलने पोलिसांची झोप उडवली होती. कॉलरने पोलिसांना सांगितले की, छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर उभ्या असलेल्या विमानात बॉम्ब ठेवण्यात आला होता, जे विमान 10 तासांनंतर उड्डाण करणार होते. त्यानंतर लगेच पोलीस पथक विमानतळावर तपासात गुंतले. दुसरीकडे पोलिसांचे दुसरे पथक फोन करणाऱ्याचा पत्ता शोधत होते. त्यानंतर काही वेळाने पोलिसांना सातारा येथून फोन आल्याची माहिती मिळाली. पोलिसांचे पथक कॉल करणाऱ्या ठिकाणी पोहोचले तेव्हा फोन करणारा हा १० वर्षांचा मुलगा असल्याचे निष्पन्न झाले. तो मुलगा अपंग असून, त्याला चालता येत नाही.
मुलाने साताऱ्यातून केला होता कॉल - दिव्यांग मुलगा दिवसभर अंथरुणावर पडून राहतो आणि मनाला वाटेल तेव्हा टीव्ही आणि मोबाईल पाहतो. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, हा मुलगा मनाने कुशाग्र आहे. टीव्हीवर तो जास्त क्राईम शो बघताना त्याला समजले की कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत पोलिसांना बोलवतात. या विचाराने मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला कॉल केला जातो. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले होते की, मुंबई पोलिसांना गेल्या ७ महिन्यांत बॉम्बच्या अफवांशी संबंधित ६० कॉल प्राप्त झाले आहेत. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील एका विमानात बॉम्ब ठेवल्याचा कॉल नवी मुंबईतील डायल ११२ क्रमांकावर आला होता. कॉल आल्याने सर्व यंत्रणा सतर्क झाल्या. पोलिसांच्या तपासणीत सातारा येथे राहणाऱ्या १० वर्षांच्या मुलाने कॉल केल्याचे उघड झाले आहे.