महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कोरोनाशी लढण्यासाठी डॉ. संजय ओक यांच्या अध्यक्षतेखाली 'टास्क फोर्स' तयार - महाराष्ट्रात कोरोना

महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील तज्ज्ञ डॉक्टरांच्या टास्क फोर्सची निर्मिती केली आहे. या टास्क फोर्सच्या अध्यक्षपदी डॉ. संजय ओक यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

डॉ. संजय ओक
डॉ. संजय ओक

By

Published : Apr 14, 2020, 2:20 PM IST

मुंबई - महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील तज्ज्ञ डॉक्टरांच्या टास्क फोर्सची निर्मिती केली आहे. या टास्क फोर्सच्या अध्यक्षपदी डॉ. संजय ओक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या टास्क फोर्स मधील डॉक्टरांशी व्हिडिओ कान्फरन्सद्वारे मुख्यमंत्र्यांनी संवाद साधला.

महाराष्ट्रात आजपर्यंत 2 हजारांहून पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून 150 जणांचा मृत्यू झाला आहे. मृत्यू दर 6 ते 7 टक्के असून 80 टक्के मृत रुग्णांना मूत्रपिंड, उच्च रक्तदाब किंवा इतर दुर्धर आजार होते. राज्यातील वाढता मृत्यू दर चिंतेचा विषय असून तो कमी करणे नव्हे तर एकाही रुग्णाचा मृत्यू होता कामा नये, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.
या टास्क फोर्समध्ये खालील डॉकटर्स असतील,

या टास्क फोर्समध्ये डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.संजय ओक, हिंदुजा रुग्णालयील डॉ. झहीर उडवाडिया, लिलावती रुग्णालय डॉ . नागांवकर, वोक्हार्ट रुग्णालयातील डॉ . केदार तोरस्कर, फोर्टीस रुग्णालयातील डॉ . राहुल पंडित, लोकमान्य टिळक रुग्णालय शिव येथील डॉ . एन.डी. कर्णिक, पी.ए.के. रुग्णालयातील डॉ . झहिर विरानी, केईएम रुग्णालयातील डॉ . प्रविण बांगर, कस्तुरबा रुग्णालयातील डॉ . ओम श्रीवास्तव यांचा समावेश असणार आहे. टीम एकीकडे राज्य शासनाला वैद्यकीय उपचारांबाबत सुयोग्य मार्गदर्शनही कारातील तसेच राज्यभरातील वैद्यकीय अधिकाऱ्यांना हॉट लाईनवर सहाय्य करतील.

डेडिकेटेड कोव्हिड रुग्णालय सुरू करणे. या रुग्णालयातील वैद्यकीय व्यवस्था, प्रत्येक रुग्णाला तो कोव्हिडग्रस्त समजून उपचार सुरू करणे, चांगल्या सुसज्ज रुग्णवाहिका, कोव्हिड आयसीयूमधील उपचार पद्धती यावर व अनुषंगिक उपचारांवर ही पथक देखरेखाही ठेवेल तसेच सल्ला देईल. मुख्य सचिव अजोय मेहता यांनी माहिती दिली.

हेही वाचा -भीमजयंती : चैत्यभूमीवर शुकशुकाट, अनुयायांकडून घरातूनच बाबासाहेबांना अभिवादन

ABOUT THE AUTHOR

...view details