महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Dec 13, 2019, 8:10 AM IST

ETV Bharat / state

आता धान उत्पादक शेतकऱ्यांना क्विंटलमागे मिळणार ५०० रुपये

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी धान उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देणार एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. आता धान उत्पादक शेतकऱ्यांना क्विंटलमागे ५०० रुपयांचे अनुदान देण्यास मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली आहे.

subsidy of Rs. 500 per quintal to the rice-growing farmers
धान उत्पादक शेतकऱ्यांना क्विंटलमागे मिळणार ५०० रुपये

मुंबई - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी धान उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देणार एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. आता धान उत्पादक शेतकऱ्यांना क्विंटलमागे ५०० रुपयांचे अनुदान देण्यास मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली आहे.

२०१९-२० या हंगामातील धान उत्पादकांसाठी केंद्र शासनाने किमान आधारभूत किंमत निश्चित केली आहे. मात्र, धान उत्पादकाच्या खर्चात वाढ झाली आहे. त्यावर शेतकऱ्यांना दिलासा देणे गरजेचे आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना क्विंटलमागे ५०० रुपयांचे अनुदान देण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details