मुंबई- राज्यात धोकादायक इमारत कोसळण्याच्या घटना नवीन नाहीत. महाडमध्ये इमारत कोसळल्याची घटना ताजी असताना आता नागपाड्यातील सुलतानी-मिश्रा या इमारतीचा काही भाग आज दुपारी एकच्या सुमारास कोसळला. या घटनेत २ जणांचा मृत्यू झाला आहे.
नागपाड्यात इमारतीचा काही भाग कोसळला, २ जणांचा मृत्यू - nagpada building
राज्यात धोकादायक इमारत कोसळण्याच्या घटना नवीन नाहीत. महाडमध्ये इमारत कोसळल्याची घटना ताजी असताना आता नागपाड्यातील सुलतानी-मिश्रा या इमारतीचा काही भाग आज दुपारी एकच्या सुमारास कोसळला. या घटनेत २ जणांचा मृत्यू झाला आहे.
![नागपाड्यात इमारतीचा काही भाग कोसळला, २ जणांचा मृत्यू नागपाड्यात एका इमारतीचा काही भाग कोसळला](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-8578177-thumbnail-3x2-nm.jpg)
आलिया रियासत कुरैशी (वय १२) आणि नूर कुरैशी (वय ७०) अशी मृतकांची नावे आहेत. या घटनेबाबत माहिती मिळताच महापालिका आणि अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. सध्या दुर्घटनास्थळी मदतकार्य सुरू आहे. दरम्यान, पालिका व म्हाडा परवानगी देत नसल्यामुळे, तसेच जमिनीचे मालक आणि विकासक, त्याचबरोबर निवासी यांच्यामध्ये वाद असल्याने धोकादायक इमारतींचा विकास गेल्या अनेक वर्षांपासून रखडला आहे. परिणामी, कधीतरी अचानक इमारत कोसळते किंवा काही भाग कोसळतो. यात काही निष्पाप लोकांचा जीव जातो. त्यामुळे, अशा घटना कधी थांबणार व जुन्या इमारतींचा पुनर्विकास कधी होणार. हा प्रश्न सर्वांना पडत आहे.
हेही वाचा- रियाचे वडील इंद्रजित चक्रवर्ती यांना पोलीस ईडी कार्यालयात घेऊन गेले