मुंबई- कोरोनाने जगभरात थैमान घातले आहे. त्या पार्श्वभूमीवर देभरात 21 दिवसांचे लाॅकडाऊन आहे. तर, राज्यात संचारबंदीही आहे. त्यामुळे नागरिक घरातच बसून आहेत. मात्र, कांदिवलीत लाॅकडाऊनदरम्यान बाहेर गेलेल्याची भावानेच हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. राजेश असे आरोपीचे नाव आहे.
हेही वाचा-लॉक डाऊन : रत्ने आणि मौल्यवान परिषद कर्मचाऱ्यांना देणार ५० कोटींचा निधी
राज्यात लाॅकडाऊन लागू असताना कांदिवलीतील राजेश पत्नीसह 25 मार्चला बाजारात गेला होता. याची माहिती त्याच्या भावास मिळताच त्याने राजेशसोबत वाद घातला. मात्र हा वाद विकोपाला गेल्याने राजेशने विरोध करणाऱ्या भावाचीच हत्या केली. या घटनेने कांदिवली परिसरात मोठी खळबळ उडाली. नागरिकांनी कोरोनाची मोठी धास्ती घेतली आहे. आता या धास्तीने हत्याही होत असल्याचे प्रकार समोर येत आहेत.
दरम्यान, देशातील 32 राज्यांसह केंद्रशासित प्रदेशांनी 31 मार्चपर्यंत संपूर्ण लॉकडाऊन जाहीर केले होते. मात्र, हा आदेश झुगारुन लोक रस्त्यावर गर्दी करत आहेत. आवश्यकता भासल्याने संचारबंदी लागू करण्याचे निर्देश केंद्राने दिले होते. त्यानंतर मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 21 दिवसांसाठी अखेर देशव्यापी लॉकडाऊन जाहीर केला आहे. त्याचा तिसरा दिवस आहे. राज्यात सध्या कोरोना बाधित रुग्णांची संख्या 130 झाली आहे. तर मृतांचा आकडा 5 वर पोहोचला आहे. देशात एकूण 694 रुग्ण कोरोना बाधित आहेत.