मुंबई- एका 21 वर्षीय तरुणीला तिच्या इन्स्टाग्रामवर अकाउंटवर खासगी व्हिडीओचे फोटो पाठवून पैशाची मागणी करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक 11 ने ही कारवाई केली. कमील मोहम्मद हनीफ पठाण (वय 25), असे आरोपीचे नाव आहे.
इन्स्टाग्रामवर खासगी फोटो व्हायरल करण्याची धमकी देत तरुणीला पैशाची मागणी मागणाऱ्याला अटक
गेल्या काही दिवसांपासून कमील मोहम्मद हनीफ पठाण एका 21 वर्षीय तरुणीला तिच्या इन्स्टाग्रामवर अकाउंटवर खासगी व्हिडिओचे फोटो पाठवून पैशाची मागणी करत होता. तसेच, त्याच्याकडे तिचे काही खासगी व्हिडिओ असल्याचे सांगत ते सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत होता.
गेल्या काही दिवसांपासून आरोपी इंस्टाग्रामवर एका 21 वर्ष पीडित युवतीला तिचे काही खासगी फोटो त्याच्याकडे असल्याचे सांगत होता. तरुणीला फोटो पाठविण्यासाठी त्याने स्व:ताचे बनावट अकाउंट बनवले होते. या अकाउंटद्वारे तो तिच्या अकाउंटवर खासगी फोटो पाठवत होता. मात्र, फोटो पाठवल्यानंतर काही वेळातच ते आरोपी डिलीट करत होता. तसेच, त्याच्याकडे तिचे काही खासगी व्हिडिओ असल्याचे सांगत ते सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत त्याने पिडीतेला पैशांची मागणी केली. याबद्दल पोलिसांकडे तक्रार केल्यानतंर पोलिसांनी तपास करत बांद्रा परिसरातून त्याला अटक केली. त्याच्या मोबाईलमध्ये पीडितेचे काही व्हिडिओ व फोटो पोलिसांना मिळून आलेले आहेत. तूर्तास आरोपीला अटक करून बांगुर नगर पोलिसांच्या हवाली करण्यात आले आहे.