महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

एसटी महामंडळातर्फे अपघातग्रस्तांना आर्थिक मदत लवकर मिळावी यासाठी विनंतीपत्र

एसटी बस अपघातात जखमी झालेल्या व्यक्तीस एसटी महामंडळाकडून आर्थिक मदत मिळावी याकरिता सदर अपघातग्रस्ताच्या मुलाने व मुंबई डबेवाल्यांनी परिवहन मंत्री व एसटी महामंडळाला विनंतीपत्र पाठवले आहे.

अपघात ग्रस्तांना आर्थिक मदत लवकर मिळावी यासाठी महामंडळ व परिवहन मंत्र्यांना विनंतीपत्र

By

Published : Sep 16, 2019, 2:53 PM IST

मुंबई -२ महिन्यांपूर्वी खालापूरजवळ झालेल्या एसटी बस अपघातात जखमी झालेल्या व्यक्तीस एसटी महामंडळाकडून आर्थिक मदत मिळावी याकरिता तळेकरांनी परिवहन मंत्री व एसटी महामंडळाला विनंतीपत्र पाठवले आहे.

अपघात ग्रस्तांना आर्थिक मदत लवकर मिळावी यासाठी महामंडळ व परिवहन मंत्र्यांना विनंतीपत्र


कुर्ला-भीमाशंकर या एसटी बसचा २ महिन्यापूर्वी खालापूरजवळ अपघात झाला होता. या अपघातात बबन तळेकर हा डबेवाला जखमी झाला होता. यात त्याच्या पायाला जबर मार लागला असून गेली २ महिने ते नायर रुग्णालयात उपचार घेत आहेत. परंतु एसटी महामंडळाकडून त्यांची कोणत्याही प्रकारची चौकशी व मदत केली नाही. सध्या त्यांना पूढील उपचारासाठी ६ ते ७ लाखांचा निधी लागणार आहे. त्यामुळे डबेवाल्यांनी परिवहन मंडळाला पत्र लिहुन लवकर मदत मिळावी यासाठी विनंती केली आहे.

हेही वाचा - 'आरेसाठी भिडवूया रे, आवाज गगनाला'...


तळेकर डबेवाले यांची परिस्थिती हलाखीची असून त्यांना इतर डबेवाले आपल्या परीने मदत करत आहेत. पण, उपचारासाठी लागणारे संपूर्ण पैसे जमत नसल्याने मुंबई डबेवाला व तळेकर यांच्या मुलाने एसटी महामंडळ तसेच परिवहन मंत्र्याना पत्र लिहून विनंती केली आहे. या विनंतीत एसटीच्या अपघातात प्रवासी जखमी झाल्यास प्रवाशाचा रुग्णालयात दाखल झाल्यापासून येणारा खर्च त्वरित महामंडळाकडून देण्यात यावा. कारण, अपघातात जखमींचा जीव गेल्यानंतर मिळणाऱ्या पैशांचा काय उपयोग? असा प्रश्न विचारत एस.टी. महामंडळ व परिवहनमंत्री यांनी याकडे लक्ष द्यावे अशी विनंती डबेवाले व तळेकर यांच्या मुलाने पत्रामार्फत केली आहे.

हेही वाचा - गोवंडी येथील 'शताब्दी'चा विस्तार; नवीन 580 खाटांच्या अत्याधुनिक रुग्णालयाचे भूमिपूजन

ABOUT THE AUTHOR

...view details