महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Mumbai Rain : मालाड मालवणीत घर कोसळले, ढिगाऱ्याखालून ५ जणांना काढले सुखरूप बाहेर - mumbai house collapse

मालाड मालवणी गेट क्रमांक ८ येथे प्लॉट नंबर ७२, न्यू कलेक्टर कंपाउंड येथील एक मजली घर बाजूच्या एक मजली घरावर कोसळले. रात्री अकरा वाजता ही दुर्घटना घडली. याच ठिकाणी लागून असलेली चार मजली इमारत धोकादायक घोषित करण्यात आली आहे. या इमारतीवर घराचा ढिगारा कोसळल्याने ही इमारत पडण्याची शक्यता निर्माण झाल्याने ती खाली करण्यात आली आहे.

A house collapsed in Malad West area of Mumbai
मालाड मालवणीत घर कोसळले

By

Published : Jun 10, 2021, 1:55 AM IST

मुंबई -मुंबईत बुधवारी दिवसभर मुसळधार पाऊस झाला. या पावसानंतर मालाड मालवणी येथील एक घर जवळच्या घरावर कोसळले. या घटनेत आतापर्यंत ढिगाऱ्याखालून ५ जणांना बाहेर सुखरूप काढण्यात आले असून कोणीही जखमी झाले नाही. या ढिगाऱ्यामुळे बाजूला असलेली धोकादायक चार मजली इमारत कोसळण्याची शक्यता आहे. त्यामुळे तीही इमारत खाली करण्याचे काम चालू असल्याची माहिती पालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली आहे.

मालाड मालवणीत घर कोसळले

धोकादायक इमारत खाली करण्याचे काम सुरू -

मालाड मालवणी गेट क्रमांक ८ येथे प्लॉट नंबर ७२, न्यू कलेक्टर कंपाउंड येथील एक मजली घर बाजूच्या एक मजली घरावर कोसळले. रात्री अकरा वाजता ही दुर्घटना घडली. याच ठिकाणी लागून असलेली चार मजली इमारत धोकादायक घोषित करण्यात आली आहे. या इमारतीवर घराचा ढिगारा कोसळल्याने ही इमारत पडण्याची शक्यता निर्माण झाल्याने ती खाली करण्यात आली आहे. दरम्यान ढिगाऱ्याखालून ५ जणांना बाहेर सुखरूप काढण्यात आले असून कोणीही जखमी झाले नाही. अशी माहिती पालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून देण्यात आली आहे.

हेही वाचा - VIDEO : मिठी नदी ओव्हरफ्लो; इमारतींमध्ये शिरलं पाणी

ABOUT THE AUTHOR

...view details