मुंबई -देशात महिलांवर होणारे अत्याचार वाढत चालले आहेत. काही दिवसांपूर्वी हैदराबाद येथे एका युवतीवर सामूहिक बलात्कार करून तिला जाळण्यात आले होते. या घटनेचे पडसाद देशभरात उमटत आहेत. या घटनेचा निषेध करताना मरीन ड्राईव्ह येथे नेरुळहुन पायाने दिव्यांग असलेला संजीव यादव एकटा आला होता. मरीन ड्राईव्हला निषेध करण्यास बंदी असल्यामुळे पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले होते. नंतर, त्याला समज देऊन सोडण्यात आले. त्याच्याशी बातचीत केली आहे 'ईटीव्ही भारत'चे प्रतिनिधी अक्षय गायकवाड यांनी...
हैदराबाद येथील कृर घटना पेपरमध्ये वाचून मला धक्काच बसला. देशात चुकीच्या घटना सुरू आहेत. कायदा सुव्यवस्थेचा कुणाला धाक उरलेला नाही. म्हणून मी नेरुळ वरून मरीन ड्राईव्ह येथे निषेध व्यक्त करण्यासाठी आलो होतो. या भागात मंत्रालय असल्यामुळे मी निषेध करण्यासाठी ही जागा निवडली. अशा आरोपींवर जर वेळेतच योग्य कारवाई झाली तर आंदोलन किंवा निषेध याचा प्रश्नच उपस्थित होत नाही. त्यामुळे अशा लोकांवर लवकरात लवकर कारवाई झाली पाहिजे. महिला सुरक्षित नाही हे चित्र बदलले पाहिजे. अशा भावना यादव यांनी व्यक्त केल्या.