महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Murder of a friend : आई वरुन शिवी देणाऱ्या मित्राला दोन सख्या भावाने संपवले - पवई एल अँड टी गेट

दोन मित्रांमध्ये वाद झाला होता त्यावेळी त्याने आई वरून शिवी दिली होती (A friend who cursed his mother) हा राग मनात ठेवून दोन सख्ख्या भावांनी मित्र विशाल अजितकुमार राव याची हत्या केल्याची (killed by two brothers) घटना गुरुवारी रात्री घडली. या प्रकरणात पोलीसांनी मोनू आणि अजय गुप्ता या आरोपींना अटक करण्यात आली आहे.

हत्या
Murder

By

Published : Jul 9, 2022, 1:23 PM IST

मुंबई: विशाल अजितकुमार राव हा पवईच्या तुंगा गाव परिसरात राहतो. तर त्याच परिसरात मोनू गुप्ता आणि अजय गुप्ता हे भावंडं राहतात. बीएसई आयटीचे शिक्षण घेणाऱया विशालची अफजलच्या मदतीने मोनू गुप्ता आणि अजय गुप्ता या भावंडांशी ओळख झाली होती. मैत्री झाल्यानंतर विशाल आणि मोनू सोबत वाद सुरु झाले. गेल्या महिन्यात विशालने मोनूला शिवी दिली (A friend who cursed his mother) होती. त्यावरून त्याचा वाद सुरु होता. त्याचा राग डोक्यात ठेवून गुरुवारी रात्री गुप्ता भावंडांनी विशालला पवई एल अँड टी गेट जवळ भेटायला बोलावले. विशाल सोबत आलेला त्याचा मित्र रस्त्याच्या पलीकडे उभा होता. एल अँड टी गेट जवळ विशाल आला असता अजय आणि अनिलने मारहाण करण्यास सुरुवात केली.

हा प्रकार विशालच्या मित्राच्या लक्षात आला. त्याने विशालला उपचारसाठी राजावाडी रुग्णालयात दाखल केले. तेथे डॉक्टरांनी विशालला मृत घोषित केले. (killed by two brothers) या घटनेची माहिती समजताच पवई पोलीस घटनास्थळी आले. पोलिसांनी गुन्हा नोंद करून तपास सुरु केला. काहीच तासात मारेकऱयांना पकडण्यात पोलिसांना यश आहे. विशाल हा गुप्ता भावंडांना भेटायला गेला तेव्हा तो फोनवरून अफजल एवढे बोलला होता अशी माहिती पोलिसांना मिळाली. त्यावरून पोलिसांनी इन्स्टाग्रामवर अफजलला शोधून काढले. त्याच्या फ्रेंडलिस्टच्या मदतीने पोलीस गुप्ता भावंडांपर्यंत पोहचले. त्या दोघांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी हत्येची कबुली दिली आहे.

हेही वाचा : Double Murder Case : दुहेरी हत्याकांडाचा उलगडा; दोन भावांनीच केली हत्या, चौघांना अटक

ABOUT THE AUTHOR

...view details