महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Fraud Mobile Crime gang : महागडे मोबाईल स्वस्तात विकणाऱ्या टोळीचा सोशल मीडियावर पर्दाफाश - Crime Branch Unit 11 in Mumbai

मुंबई (Mumbai) येथे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर महागडे अँड्रॉइड मोबाईल स्वस्तात विकण्याचे आमिष दाखवणाऱ्या, (Fraud Mobile Crime gang) गुन्हेगारांना मुंबईतील गुन्हे शाखा युनिट 11 (Crime Branch Unit 11 in Mumbai) ने अटक केली आहे. ग्राहकाने मोबाईल मिळविण्यासाठी मेमोरँडम लिंकवरील फॉर्ममध्ये आपला तपशील भरला असता, त्यांना कॉल सेंटरमधून फोन यायचा. दिलेल्या पत्त्यावर कॅश ऑन डिलिव्हरी करुन, हे आरोपी ग्राहकांना स्वस्तातले जुने मोबाईल पॅक करून पाठवायचे, तर कधी मोबाईल ऐवजी बटाटे, दगड पाठवायचे.

Fraud Mobile Crime gang
गुन्हेगारांना अटक

By

Published : Jul 25, 2022, 1:55 PM IST

मुंबई : (Mumbai) सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर महागडे अँड्रॉइड मोबाईल स्वस्तात विकण्याचे निवेदन देऊन, ग्राहकांना आमिष दाखवणाऱ्या (Fraud Mobile Crime gang) गुन्हेगारांना मुंबईतीलगुन्हे शाखा युनिट 11 (Crime Branch Unit 11 in Mumbai)ने अटक केली आहे. जेव्हा एखादा ग्राहक मोबाईल मिळविण्यासाठी या मेमोरँडम लिंकवरील फॉर्ममध्ये आपला तपशील भरतो, त्याच वेळी त्याला मुंबईत सुरू असलेल्या कॉल सेंटरमधून फोन यायचा की, हा मोबाईल कॅश ऑन डिलिव्हरी तुम्हाला तुम्ही दिलेल्या पत्त्यावर मिळेल. त्यानंतर हे आरोपी कधी ग्राहकांना स्वस्तातले जुने मोबाईल पॅक करून पाठवायचे, तर कधी मोबाईल ऐवजी बटाटे, दगड पाठवायचे.


विशेष म्हणजे हे लोक मुंबईबाहेर राहणाऱ्या अशा ग्राहकांना टार्गेट करायचे. ज्यामध्ये सर्वाधिक ग्राहक यूपी आणि बिहार आणि झारखंडमधील आहेत. आणि अश्याच प्रकारच्या ग्राहकांना गोवण्यात आले आहे. मुंबई गुन्हे शाखा युनिट 11 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक चौहान यांच्या मार्गदर्शनाखाली एका कॉल सेंटरवर छापा टाकून, 3 हजारांहून अधिक जुन्या मॉडेलचे मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. तसेच महागड्या मोबाईलचे फोटो फेसबुकवर टाकून महागडे मोबाईल स्वस्तात विकण्याचा दावा करणारे, काही लोक असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती. ज्यामध्ये आतापर्यंत हजारो लोकांची निवड झाली आहे.

२५ हून अधिक तरुणींना ताब्यात-अशा तक्रारीनंतर गुन्हे शाखेचे पीआय पाटील व त्यांच्या पथकाने छापा टाकून तीन हजारांहून अधिक मोबाईल फोन, लॅपटॉप व इतर इलेक्ट्रॉनिक वस्तू जप्त करून, अनेक गुन्हेगारांना अटक केली. या प्रकरणी गुन्हे शाखेने कॉल सेंटरमध्ये काम करणाऱ्या २५ हून अधिक तरुणींना ताब्यात घेतले असून, त्यांचे जबाब नोंदवत आहेत. या सर्व मुलींना साक्षीदार बनवून आम्ही या प्रकरणाचा अधिक तपास करणार आहोत, अशी माहीती मुंबई गुन्हे शाखेचे डीसीपी संग्राम सिंग निशानदार यांनी दिली.



हेही वाचा :Mumbai crime: मुंबईतील खार परिसरात महिलेवर हल्ला; तिघांवर गुन्हा दाखल

ABOUT THE AUTHOR

...view details