महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Mumbai Crime News: बायकोचा केला खून; पाच वर्षाच्या मुलाच्या साक्षीवर डॉक्टर बापाला झाली जन्मठेप - बापाला झाली जन्मठेप

मुंबई दादरमध्ये राहणाऱ्या डॉक्टर नवऱ्याने आपल्या विभक्त बायकोचा चाकूने खून केला होता. या घटनेचा प्रत्यक्ष साक्षीदार त्यांचा पाच वर्षाचा मुलगाच ठरला आहे. मुलाच्या साक्षीमुळे बायकोला मारणारा 47 वर्षाच्या डॉक्टर नवर्‍याला सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

Mumbai Crime News
बापाला झाली जन्मठेप

By

Published : Jul 25, 2023, 10:12 PM IST

मुंबई : माणूस भानावर नसला की काहीतरी अघटीत घडते, नंतर त्याचा पश्चाताप केवळ आपल्या हाती उरतो. तशीच काहीशी घटना नवरा बायको आणि एक मुलगा असलेल्या कुटुंबात घडली आहे. व्यवसायाने डॉक्टर असलेल्या 47 वर्षीय व्यक्तीचे 2009 मध्ये लग्न झाले होते. पती आणि पत्नी यांचा संसार सुरू झाला. 2012 मध्ये त्यांना मुलगा झाला. परंतु त्यानंतर त्यांच्यामध्ये वाद होऊ लागले. परिणामी सततच्या भांडणामुळे पत्नी वैतागली आणि नंतर कौटुंबिक न्यायालयात तिने खटला दाखल केला.



मुलाला ठेवले बहिणीकडे : मुलाच्या जन्मानंतर मुलाच्या आईने नवऱ्याच्या विरोधातच कुटुंब न्यायालयात खटला दाखल केला होता. त्यामुळे सुनावणी सुरू असल्यामुळे पतीपासून पत्नी विभक्त राहत होती. मुलगा तिच्याकडे होता. मुलाचे पालन करण्यासाठी तिला कामधंदा करण्यासाठी जावे लागत होते. त्यामुळे मुलाला कुठे ठेवायचे हा प्रश्न होता. परंतु तिने तिच्या बहिणीकडेच मुलाला ठेवले. पत्नीचे घर आणि तिच्या बहिणीचे घर हे जवळच होते.



बायकोला मुलांना जेवणासाठी घेऊन गेला: प्रत्यक्षात ही घटना 2016 ला घडली होती. त्यावेळेला नवरा बायको आणि मुलगा यांना घ्यायला मुलाच्या मावशीकडे गेला. बायकोला मुलाला हॉटेलमध्ये जेवण करण्यासाठी जायचे आहे असे सांगितले होते. त्यानंतर ते हॉटेलला गेले, चित्रपट बघितला. तसेच त्यांनी बायकोला आणि मुलाला स्वतःच्या घरी नेले. तोपर्यंत बरीच रात्र झाली होती. त्याच रात्री दोघांमध्ये वाद झाला. मुलासमोरच बायकोला चाकूने मारले आणि तिथेच ती कोसळली. मुलाला बापाने दुसऱ्या खोलीमध्ये जायला सांगितले. या संदर्भातला सर्व घटनाक्रम मुलगा आणि त्याची मावशी यांनी न्यायालयामध्ये सांगितला.



बापाला जन्मठेपेची शिक्षा :हा सर्व घटनाक्रम सरकारी वकिलांनी सत्र न्यायालयात मांडला आणि सत्र न्यायालयाने मुलाला विचारणा केली. मुलाच्या साक्षीमुळे संपूर्ण प्रकरणाला तथ्य आणि पुराव्याला बळ मिळाले. पाच वर्षाच्या मुलाची साक्ष ऐकून न्यायालयाने क्रूर घटना असे म्हणत मुलाच्या बापाला जन्मठेपेची शिक्षा सुनावली.


हेही वाचा -

  1. Fatal Attack On Married Couple : लग्न मोडल्याच्या रागातून विवाहित दाम्पत्यावर जीवघेणा हल्ला; घटना cctv मध्ये कैद
  2. UP Crime News : भावाने बहिणीचा केला शिरच्छेद, हातात घेऊन फिरला गावभर! पहा धक्कादायक सैराट व्हिडिओ
  3. Ulhasnagar Murder : रस्त्याने चालताना धक्का लागल्याच्या वादातून व्यक्तीचा खून; घटना सीसीटीव्हीत कैद

ABOUT THE AUTHOR

...view details