मुंबई - आपल्या लाडक्या बाप्पाची मुंबईकरांनी सोमवारी मोठ्या भक्तिभावाने प्रतिष्ठापना केली. मंगळवारी दीड दिवसांच्या बाप्पाला भाविकांनी भक्तिमय वातावरणात निरोप दिला. मुंबईत मंगळवारी सायंकाळी सहा वाजेपर्यंत 38 हजार 570 गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. रात्री उशिरा तसेच सकाळपर्यंत विसर्जन सुरू राहणार असल्याने या आकड्यात आणखी वाढ होईल.
हेही वाचा-मुंबईतल्या दोन वर्षीय आरव कदमची 'इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड'मध्ये नोंद
मुंबईत गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. अकरा दिवस मुंबईकर तल्लीन होऊन बाप्पाची सेवा करतात. गणेशोत्सवा दरम्यान दीड, पाच, सात आणि अकरा दिवसांनी गणेश मूर्तींचे विसर्जन केले जाते. मुंबईत मंगळवारी दीड दिवसांच्या गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. त्यासाठी पालिकेने चौपाटीवर योग्य त्या सोयी सुविधा पुरवल्या आहेत. विसर्जनासाठी पालिकेने कृत्रिम तलाव उपलब्ध करून दिले आहेत.