मुंबई - आझाद मैदान पोलीस ठाण्यात काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या विरोधात अॅड. अटलबिहारी दुबे यांनी तक्रार दाखल केली आहे. जागतिक योग दिवस जगभरात 21 जून रोजी साजरा करण्यात आला होता. भारतात देखील या दिवशी सर्वत्र योग्य दिवस साजरा होत असताना काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी लष्कराच्या श्वान पथकाचा फोटो ट्विट करीत त्यावर न्यु इंडिया म्हणून लिहिले होते.
राहुल गांधी यांच्या विरोधात आझाद मैदान पोलीस ठाण्यात तक्रार - भारतीय दंडसंहिता 505
21 जून रोजी जगभर साजरा करण्यात आलेल्या योगदिनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी लष्कराच्या श्वान पथकाचा फोटो ट्विट करीत त्यावर न्यु इंडिया म्हणून लिहिले होते. याप्रकरणी मुंबई हायकोर्टातील अॅड. अटलबिहारी दुबे यांनी त्यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे.
राहुल गांधी
राहुल गांधी यांचे ट्विट हे नागरिकांमध्ये चुकीचा संदेश देणारा असल्याने भारतीय दंडसंहिता 505 च्या नुसार आझाद मैदान पोलीस ठाण्यात लेखी तक्रार करण्यात आली आहे. राहुल गांधी यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्याची मागणी तक्रारदार अॅड. अटलबिहारी दुबे यांनी केली आहे.
Last Updated : Jun 24, 2019, 4:35 PM IST