महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

खोड्या करतो म्हणून मामानेच केली भाच्याची गळा दाबून हत्या - हत्या

राशिवाला चाळेतील अल्ताफ नगरमध्ये ही घटना घडली. आरोपी मृतक शिवच्या घराशेजारीच राहायचा. शिवने आपल्या आत्याच्या नवऱ्याची म्हणजेच आरोपी मामा हिम्मतची चप्पल लपवून ठेवली होती. याच रागातून आरोपीने शिवची गळा दाबून हत्या केली.

murder
खोड्यांना कंटाळून मामानेच केली भाच्याची गळा दाबून हत्या

By

Published : Mar 1, 2020, 6:05 PM IST

Updated : Mar 1, 2020, 6:14 PM IST

मुंबई - खोड्या करतो म्हणून मामानेच भाच्याची गळा दाबून हत्या केल्याची धक्कादायक घटना शनिवारी रात्री घाटकोपरमध्ये घडली. शिव पवार (वय १५ वर्ष) असे मृतकाचे नाव आहे. हत्या केल्यानंतर आरोपी मामा हिंमत ज्ञानी गोहिल (वय ६८ वर्ष) स्वत: घाटकोपर पोलीस ठाण्यात हजर झाला.

खोड्या करतो म्हणून मामानेच केली भाच्याची गळा दाबून हत्या

हेही वाचा -'शिवसेनेने विचार केला पाहिजे, हे सरकार राष्ट्रवादी चालवतंय'

राशिवाला चाळेतील अल्ताफ नगरमध्ये ही घटना घडली. आरोपी मृतक शिवच्या घराशेजारीच राहायचा. शिवने आपल्या आत्याच्या नवऱ्याची म्हणजेच आरोपी मामा हिम्मतची चप्पल लपवून ठेवली होती. याच रागातून आरोपीने शिवची गळा दाबून हत्या केली. त्यानंतर तो स्वतःच घाटकोपर पोलीस ठाण्यात हजर झाला. याप्रकरणी हत्येचा गुन्हा नोंदवून घाटकोपर पोलिसांनी आरोपीला अटक केली.

Last Updated : Mar 1, 2020, 6:14 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details