महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Drug Peddler Arrested : दहिसर परिसरातून 27 किलो गांजा जप्त; 67 वर्षीय आरोपी अटकेत - अँटी नार्कोटिक्स सेल कांदिवली

कांदिवली युनिटने दहिसर परिसरातून 62 वर्षीय ड्रग्ज पेडलरला अटक केली असून पेडलरकडून 27 किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपी पेडलरविरुद्ध एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला.

67 वर्षीय आरोपी अटकेत
67 वर्षीय आरोपी अटकेत

By

Published : Mar 26, 2022, 4:12 PM IST

मुंबई- मुंबई अँटी नार्कोटिक्स सेलच्या कांदिवली युनिटने दहिसर परिसरातून 62 वर्षीय ड्रग्ज पेडलरला अटक केली असून पेडलरकडून 27 किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपी पेडलरविरुद्ध एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला.

दहिसर परिसरातून 27 किलो गांजा जप्त

संशयाच्या आधारे चौकशी - आरोपी संपत लहू डोलारे (वय 62) हा दहिसर परिसरातील शंकर टेलरजवळ उभा होता. पोलिसांना या व्यक्तीवर काही संशय आला आणि त्याच्या बॅगची तपासणी केली असता त्याच्याकडून 6 किलो गांजा जप्त करण्यात आला. पोलिसांनी घटनास्थळी चौकशी केली. त्याआधारे पोलिसांनी आरोपी पेडलरच्या घरातून 21 किलो गांजा जप्त केला. आज आरोपीला न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. हे अंमली पदार्थ कोणाकडून आणले व कोठे पुरवले जात होते, याचा शोध अधिकारी घेत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details