महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मुंबईत 993 नव्या कोरोनाग्रस्तांची वाढ, 32 रुग्णांचा मृत्यू - मुंबई कोरोना बातमी

मुंबईत आज 993 नव्या कोरोनाग्रस्तांची वाढ झाली असून 32 जणांचा मृत्यू झाला आहे. एकूण कोरोनाबाधितांचा आकडा 2 लाख 57 हजार 500 वर पोहोचला असून सध्या 18 हजार 753 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

संपादित छायाचित्र
संपादित छायाचित्र

By

Published : Oct 31, 2020, 9:01 PM IST

Updated : Oct 31, 2020, 11:10 PM IST

मुंबई- आज (दि. 31 ऑक्टोबर) मुंबईत कोरोनाच्या नव्या 993 रुग्णांची नोंद झाली असून 32 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. गेल्या वीस दिवसांत रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 69 वरून 164 दिवस वाढल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

मृत्यू झालेल्या 32 रुग्णांपैकी 21 रुग्णांना दिर्घकालीन आजार होते. मृतांमध्ये 22 पुरुष तर 10 महिला रुग्ण आहेत. मुंबईमधील कोरोनाग्रस्तांचा आकडा 2 लाख 57 हजार 500 वर पोहोचला आहे. तर, मृतांचा आकडा 10 हजार 250 वर पोहोचला आहे. मुंबईमधून आज (शनिवार) 680 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. शहरातील डिस्चार्ज देण्यात आलेल्यांचा आकडा 2 लाख 27 हजार 822 वर गेला आहे. सध्या मुंबईत 18 हजार 753 सक्रिय रुग्ण असून त्यांच्यावर विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहेत.

मुंबईत कोरोनाचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 88 टक्क्यांवर पोहोचले आहे. रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 164 दिवस तर सरासरी दर 0.42 टक्के आहे. मुंबईत सध्या कोरोनाचे रुग्ण आढळून आलेल्या 609 चाळी आणि झोपडपट्टी प्रतिबंधित क्षेत्र घोषित करून सील करण्यात आल्या आहेत. तसेच 7 हजार 479 इमारती व इमारतीच्या विंग, काही मजले सील करण्यात आले आहेत. तर, कोरोनाचे निदान करण्यासाठी 15 लाख 26 हजार 460 चाचण्या करण्यात आल्या आहेत.

हेही वाचा -मूठभर उद्योगपतींच्या हितासाठी हे काळे कायदे तयार करण्यात आले - एच. के. पाटील

Last Updated : Oct 31, 2020, 11:10 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details