महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Sim Card Fraud Case: बनावट कॉल सेंटरसाठी 99 बनावट सिमकार्ड केले अ‍ॅक्टिव्हेट; एकास अटक

मुंबईच्या बोरिवली पश्चिमेला असलेल्या MHB पोलिसांनी अशाच एका आरोपीला अटक केली आहे. ज्याने बनावट मार्गाने आधार कार्डची डुप्लिकेट करून 99 सिमकार्ड अ‍ॅक्टिव्हेट केली होती.

Sim Card Fraud Case
आरोपीस अटक

By

Published : Jun 22, 2023, 10:04 PM IST

बनावट सिमकार्ड प्रकरणी पोलिसांची प्रतिक्रिया

मुंबई: उत्तर प्रदेशातील जौनपूर येथील बनावट कॉल सेंटरा चालवले जात होते. यूपी पोलिसांनी इथे छापा टाकल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले. ज्यामध्ये 123 सिमकार्ड मुंबईतील होती. दहिसर पश्चिम ओम साई मोबाईल सेंटरमधून 99 सिमकार्ड अ‍ॅक्टिव्हेट केली गेली होती.


सिमकार्ड सक्रिय करणाऱ्या आरोपीला अटक : या प्रकरणाची माहिती यूपी पोलिसांनी मुंबई पोलिसांना दिली. त्यानंतर एअरटेल कंपनीच्या नोडल ऑफिसरने MHB पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. एमएचबी पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण आणि सूत्रांच्या मदतीने दहिसर पश्चिम ओम साई मोबाइलवरून सिमकार्ड सक्रिय करणाऱ्या आरोपीला अटक केली. शेरू चंद्रबाली चव्हाण (वय 30) असे आरोपीचे नाव आहे. जो दहिसर पश्चिम येथील रहिवासी आहे. या बनावट सिमकार्ड अ‍ॅक्टिव्हेशन प्रकरणातील ७ जण अद्याप फरार असून, त्यांचा शोध एमएचबी पोलीस घेत आहेत.



खंडणीची मागणी करणाऱ्यास अटक:जीवे मारण्याची धमकी देऊन तक्रारदारास खंडणीची मागणी केल्या प्रकरणी आरोपी गुंडास अटक करण्यात आली आहे. मुंबईतील दहीसर पश्चिम परिसरात ही घटना 2 जून रोजी घडली होती. दिनांक 02/06/2023 रोजी रात्री 12.30 वा. सुमारास दहीसर पश्चिम परिसरातील गंगा कुंचीकुर्वे नावाचा गुंड प्रवृत्तीच्या इसमाने 'जाँय अँड जाँय' हाँटेलमध्ये दोन साथीदारांसोबत प्रवेश केला. यानंतर त्याने हॉटेल मॅनेजरला चाकूचा धाक दाखवून दोन लाख रुपयांची खंडणी व फुकट दारुची मागणी केली. त्यास तक्रारदाराने नकार दिला असता आरोपीने तक्रारदार मॅनेजरला शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली. मॅनेजरच्या तक्रारीवरून आरोपींविरुद्ध एम.एच.बी. कॉलनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीची पोलीस कोठडी घेऊन त्याच्याकडून इतर गुन्ह्यांविषयी माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न पोलीस करीत आहे.

हेही वाचा:

  1. Illegal Weapons Seized: शिक्षण वाऱ्यावर सोडून शस्त्रांच्या तस्करीत उतरले; पोलिसांच्या जाळ्यात फसले
  2. Anil Ramode Suspended: लाचखोर अतिरिक्त विभागीय आयुक्त डॉ. अनिल रामोड अखेर निलंबित
  3. Chatrapati Sambhajinagar Crime : हिरे व्यावसायिकाचे थोडक्यात वाचले 110 कोटी, सायबर सेलमुळे दुकानदारावरचा ऑनलाईन दरोडा टळला

ABOUT THE AUTHOR

...view details