मुंबई- आज (दि. 3 जून) मुंबईत 961 नव्या कोरोनाग्रस्तांची वाढ झाली असून 27 रुग्णांचा मृत्यू झाला तर 897 जण कोरोनामुक्त झाले आहेत. रुग्ण दुपटीचा कालावधी 500 दिवसांवर पोहचला आहे. एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा 7 लाख 8 हजार 968 वर पोहचला आहे. मृतांची एकूण संख्या 14 हजार 965 वर पोहचला आहे. आतापर्यंत 6 लाख 75 हजार 193 वर पोहचली आहे. मुंबईत सध्या 16 हजार 612 सक्रिय रुग्ण आहेत.
आतापर्यंत 63 लाख 44 हजार 645 जणांच्या चाचण्या
मुंबईत कोरोना रुग्ण आढळून आलेल्या 33 चाळी आणि झोपडपट्ट्या कंटेंनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आल्या आहेत. तर 145 इमारती रुग्ण आढळून आल्याने सील करण्यात आल्या आहेत. कोरोना रुग्णांचा शोध घेण्यासाठी आज 24 हजार 667 तर आतापर्यंत एकूण 63 लाख 44 हजार 645 चाचण्या करण्यात आल्या आहेत, अशी माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.
रुग्ण संख्येत चढ उतार सुरूच
1 मे रोजी 3908, 2 मे रोजी 3672, 3 मे रोजी 2662, 4 मे रोजी 2554, 5 मे रोजी 3879, 6 मे रोजी 3056, 7 मे रोजी 3039, 8 मे रोजी 2678, 9 मे रोजी 2403, 10 मे रोजी 1794, 11 मे रोजी 1717, 12 मे रोजी 2116, 13 मे रोजी 1946, 14 मे रोजी 1657, 15 मे रोजी 1447, 16 मे रोजी 1544, 17 मे रोजी 1240, 18 मे रोजी 953, 19 मे रोजी 1350, 20 मे रोजी 1425, 21 मे रोजी 1416, 22 मे रोजी 1299, 23 मे रोजी 1431, 24 मे रोजी 1057, 25 मे रोजी 1037, 26 मे रोजी 1362, 27 मे रोजी 1266, 28 मे रोजी 929, 29 मे रोजी 1048, 30 मे रोजी 1066, 31 मे रोजी 676, 1 जून रोजी 831, 2 जूनला 925, 3 जूनला 961 नवे रुग्ण आढळून आले आहेत.
हेही वाचा -लसीच्या ग्लोबल टेंडरबाबत मंगळवारपर्यंत स्पष्टता - महापौर किशोरी पेडणेकर यांची माहिती