मुंबई :92 नगर परिषदांच्या निवडणुकांबाबत सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी होणार ( 92 municipal council Elections Hearing ) आहे. 92 नगर परिषदेच्या थेट नगराध्यक्ष निवड ओबीसी राजकीय आरक्षण याबाबत सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी होणार असून महत्त्वाचा निर्णय येण्याची देखील शक्यता ( OBC Political Reservation Hearing ) आहे. आज सकाळी सर्वोच्च न्यायालयात याबाबत सुनावणी होणार आहे. गेल्या काही महिन्यापासून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लांबणीवर पडल्या आहेत.
ओबीसीचे राजकीय आरक्षण :ओबीसीचे राजकीय आरक्षण स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये लागू होणार की नाही याबाबतची याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. गेल्या सुनावणीत परिस्थिती जैसे थे ठेवण्याच्या सूचना सर्वोच्च न्यायालयाने दिल्या होत्या. न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचे न्यायालयाने पुनर्विलोकन करावे अशी याचिका राज्य सरकारकडून सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. यावर आज ही महत्त्वाची सुनावणी पार पडणार आहे.
92 नगरपरिषदांच्या निवडणुका जाहीर :तात्कालीन सरकारने 92 नगरपरिषदांच्या निवडणुका जाहीर केल्या ( 92 municipal council Elections Hearing ) होत्या. मात्र याचवेळी ओबीसी आरक्षणाच्या बाबतीत सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू होती. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये ओबीसी आरक्षण लागू व्हावं यासाठी राज्य सरकार प्रयत्न करत होत. मात्र ओबीसीचे आरक्षण लागू न करता निवडणुका घ्यावा तसा निकाल सर्वोच्च न्यायालयाचा आहे. यावर ही महत्त्वाची सुनावणी पार पडणार आहे.
मुंबई प्रभाग रचनेवर देखील आज सुनावणी : राज्यामध्ये उद्धव ठाकरे यांच्या सरकार असताना मुंबई महानगरपालिका निवडणुकीआधी प्रभाग रचना तयार करण्यात आली होती. नव्या प्रभाग रचनेनुसार 236 प्रभाग रचना तयार करण्यात आल्या होत्या मात्र राज्यांमध्ये सरकार बदलल्यानंतर शिंदे फडणवीस सरकारने जुनीच प्रभाग रचना निवडणुकीसाठी लागू केली ( SC Mumbai municipal elections Hearing ) आहे. या विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. याबाबत देखील आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.