मुंबई - राज्यात आज ११,२०४ रुग्ण बरे होऊन घरी गेले. यामुळे कोरोनावर मात करून बरे होणाऱ्या रुग्णांचा आकडा १३,६९,८१० वर पोहचला आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८५.८६ टक्क्यांवर पोहोचले आहे. आजही नवीन रुग्णांपेक्षा बरे झालेल्यांची संख्या जास्त नोंदवली गेली आहे. राज्यामध्ये दिवसभरात ९ हजार ६० नवीन रुग्ण आढळले आहेत. राज्यातील उपचाराखाली असलेल्या कोरोना रुग्णांची संख्या देखील कमी होऊन १,८२,९७३ एवढी कमी झाली आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.
महाराष्ट्र कोरोना अपडेट : ९ हजार ६० नवीन रुग्ण, १५० मृत्यू - कोरोना महाराष्ट्र
दिवसभरात ९ हजार ६० नवीन रुग्ण आढळले आहेत. राज्यातील उपचाराखाली असलेल्या कोरोना रुग्णांची संख्या देखील कमी होऊन १,८२,९७३ एवढी कमी झाली आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.
महाराष्ट्र कोरोना अपडेट
आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ८१,३९,४६६ नमुन्यांपैकी १५,९५,३८१ नमुने पॉझिटिव्ह (१९.६ टक्के) आले आहेत. राज्यात २४,१२,९२१ लोक होम क्वारंटाइनमध्ये आहेत. सध्या २३,३८४ लोक संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत. राज्यात आज १५० कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून एकूण ४२ हजार ११५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.६४ टक्के एवढा आहे.