मुंबई- कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना देशभरात टाळेबंदी करण्यात आली. टाळेबंदीच्या काळात एक 90 वर्षीय जपानी महिला मुंबईत अडकली. तिच्या नवऱ्यासह तिलाही कोरोनाची लागण झाली. कोरोनामुळे या महिलेच्या नवऱ्याचा दुर्दैवाने मृत्यू झाला. मात्र, तरीही न डगमगता औषधोपचाराला प्रतिसाद देत या महिलेने कोरोनावर मात केली आहे. भारतात एका विदेशी वयोवृद्ध महिलेने कोरोनावर मात केल्याची ही पहिलीच घटना आहे.
टाळेबंदीमुळे मुंबईत अडकलेल्या 90 वर्षीय जपानी महिलेची कोरोनावर मात, महाराष्ट्रीय नवऱ्याचा मृत्यू - कोविड योद्धा बातमी
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना देशभरात टाळेबंदी करण्यात आली. टाळेबंदीच्या काळात एक 90 वर्षीय जपानी महिला मुंबईत अडकली. तिच्या नवऱ्यासह तिलाही कोरोनाची लागण झाली. कोरोनामुळे या महिलेच्या नवऱ्याचा मृत्यूही झाला. मात्र, तरीही औषधोपचाराला प्रतिसाद देत या महिलेने कोरोनावर मात केली आहे.
ही जपानी महिला आणि तिचे महाराष्ट्रीयन पती दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात भारतात येतात. पती हे व्यवसायाने कलाकार होते. भारतात आल्यावर ते मुंबईत पश्चिम उपनगरात बोरिवली येथील आयसी कॉलनी येथे वास्तव्यास असतात. यावर्षीही ते भारतात आले होते. मार्च महिन्यात ते पुन्हा जपानला जाणार होते. मात्र, त्याच वेळी कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने देशभरात टाळेबंदी जाहीर करण्यात आले. यामुळे ते दोन्ही दाम्पत्य भारतातच अडकले. 94 वर्षीय पतीला कोरोनाची लागण झाली. कोरोनामुळे 3 जून रोजी त्यांचा मृत्यू झाला.
पत्नीलाही कोरोनाची लागण झाली होती. प्रकृती गंभीर असलेल्या महिलेला यांना 9 जूनला पहाटे 4.15 वाजण्याच्या सुमारासा कांदिवलीच्या एका रुग्णालयातील अतिदक्षता विभागात भरती करण्यात आले. 9 ते 26 जून असे 18 दिवस त्यांच्यावर उपचार करण्यात आले. रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांनी महिलेलायांना बरे करण्यासाठी प्रयत्न केले. अखेर 26 जूनला त्यांचा कोरोना चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आल्यावर त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आल्याची माहिती डॉ. ब्रिजेश पांडे यांनी दिली.
हेही वाचा -...अन्यथा १ हजार रुपये दंड भरा, मुंबई महापालिकेचा इशारा