महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Mycelial rubella disease मुंबईत झोपडपट्टीतील लहान मुलांमध्ये मिसेल रुबेलाचा प्रसार अधिक; वर्षभरात ९० रुग्ण - मुंबईत ९० रुग्ण

Mycelial rubella disease: मुंबईमध्ये मिसेल रुबेला म्हणजेच गोवर आजाराचे रुग्ण वाढू लागेल आहेत. विशेष म्हणजे मुंबईमधील झोपडपट्टी विभागात या आजाराचे रुग्ण वाढू लागले आहेत. गेल्या वर्षभरात ९० रुग्ण आढळून आले असून त्यापैकी १ मृत्यू झाला आहे. तसेच ३ मृत्यू हे संशयित आहेत. त्यांचा अहवाल आल्यावर मृत्यूचे नेमके कारण समोर येणार आहे. या आजाराकडे दुर्लक्ष केल्यास लहान मुलांचा मृत्यू होऊ शकतो.

Mycelial rubella disease
Mycelial rubella disease

By

Published : Nov 9, 2022, 7:59 PM IST

मुंबई:मुंबईमध्ये मिसेल रुबेला म्हणजेच गोवर आजाराचे रुग्ण वाढू लागेल आहेत. विशेष म्हणजे मुंबईमधील झोपडपट्टी विभागात या आजाराचे रुग्ण वाढू लागले आहेत. गेल्या वर्षभरात ९० रुग्ण आढळून आले असून त्यापैकी १ मृत्यू झाला आहे. तसेच ३ मृत्यू हे संशयित आहेत. त्यांचा अहवाल आल्यावर मृत्यूचे नेमके कारण समोर येणार आहे. या आजाराकडे दुर्लक्ष केल्यास लहान मुलांचा मृत्यू होऊ शकतो. Mycelial rubella disease यासाठी मुंबईकरांनी लहान बालकांना वेळीच मिसेल रुबेलावरील लस द्यावी, असे आवाहन पालिकेच्या आरोग्य विभागाच्या मुख्य कार्यकारी आरोग्य अधिकारी मंगला गोमारे यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना केले आहे.

लहान मुलांमध्ये मिसेल रुबेलाचा प्रसार अधिक

मुंबईत ९० रुग्ण, १ मृत्यूमिसेल रुबेला म्हणजेच गोवर हा आजार संसर्गजन्य आजार आहे. या आजाराची लागण होऊ नये, म्हणून लहान मुलांना जन्मानंतर ९ व्या आणि १६ व्या महिन्यात लस दिली जाते. दरवर्षी दोनवेळा लसीकरण केले जाते. जंतावर औषध दिले जाते. मात्र त्यानंतर मुंबईमध्ये जानेवारीपासून आतापर्यंत ९० रुग्ण आढळून आले आहेत. त्यात १ लहान मुलांचा मृत्यू झाला आहे. गोवंडी येथे ३ लहान मुलांचा मृत्यू झाला आहे. Mycelial rubella disease मात्र हे मृत्यू मिशेल रुबेलाचे आहेत का ? हे मृत्यू अहवालानंतर समोर येणार आहे. मुंबईमधील झोपडपट्टी विभाग असलेल्या मानखुर्द गोवंडी एम ईस्ट, एमवेस्ट, जी नॉर्थ धारावी, कुर्ला एल वॉर्ड, पी नॉर्थ मालाड येथे मोठ्या प्रमाणात झोपडपट्टी असून या याठिकाणी रुग्णसंख्या सर्वाधिक असल्याचे समोर आले आहे, अशी माहिती आरोग्य अधिकारी मंगला गोमारे यांनी दिली आहे.

गोवंडीत २ महिन्यात ५७ रुग्ण, १ मृत्यू, ३ संशयित मृत्यू एम ईस्ट गोवंडी परिसरामध्ये सुमारे ३ हजार झोपड्या असून १२५६४ नागरिक येथे राहतात. त्यामधील ९१५ घरांमध्ये ४०८६ नागरिकांची तपासणी करण्यात आली. त्यात ताप, खोकला, सर्दी आणि अंगावर लालसर डाग असलेले रुग्ण आढळून येत आहेत. या विभागात सप्टेंबर महिन्यात २६ तर ऑक्टोबर महिन्यात ३१ रुग्ण आढळून आले आहेत. गेल्या दोन दिवसात १५ रुग्ण आढळून आले आहेत. Mycelial rubella disease त्यामधील ४ ते ६ वयोगटातील ५ लहान मुले आहेत. यापैकी ६ नमुने पुणे येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वायरॉलॉजी यांच्याकडे तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. या विभागात मागील महिन्यात १ लहान मुलाचा मृत्यू झाला आहे. तर ३, ५ आणि दिड वर्षाच्या ३ मुलांचे गेल्या दोन दिवसात मृत्यू झाले आहेत. हे मृत्यू नेमके मिसेल रुबेलामुळे झाले आहेत का ? याची तपासणी केली जात आहे. त्याच्या अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण समोर येणार असल्याचे आरोग्य अधिकारी मंगला गोमारे यांनी सांगितले आहे.

गोवंडीवर विशेष लक्ष गोवंडी विभागात मिसेलचे रुग्ण आढळून आल्याने या विभागातील रुग्णालयांना ताप आणि अंगावर लालसर डाग असलेले रुग्ण आढळून आल्यास आरोग्य विभागाला माहिती देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या विभागात व्हिटॅमिन ए च्या गोळ्या औषधे देणे, इम्युनायझेशन मोहीम सुरू करण्यात आली आहे. त्यासाठी आरोग्य विभागाचे अधिक कर्मचारीही पाठवण्यात आले आहेत. Mycelial rubella disease ज्या मुलांना जन्मानंतर ९ व्या आणि १६ व्या महिन्यात मिसेलची लस देण्यात आलेली नाही, अशा बालकांना १० ते १२ नोव्हेंबर दरम्यान लस दिली जाणार आहे. अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.

मिसेल विरोधात पालिकेची मोहीममुंबईमध्ये विशेष करून झोपडपट्टी विभागात लहान मुलांना मिसेल रुबेलाची लस दिली जात नसल्याने रुग्ण आढळून येत आहे. या विभागात अशिक्षित नागरिक असल्याने लसीकरणाकडे दुर्लक्ष केले जाते. मुंबई महानगरपालिकेकडून बालकाच्या जन्मानंतर ९ व्या आणि १६ व्या महिन्यात मिसेलची लस देण्यात येते. एखाद्या बालकाचे लसीकरण राहिले असल्यास आरोग्य विभागाची लसीकरण मोहीम सुरु असते. Mycelial rubella disease वर्षातून दोनवेळा मुलांना जंताच्या गोळ्या दिल्या जातात. ज्या विभागात मिसेल रुबेलाचे रुग्ण आढळून आले आहेत, अशा ठिकाणी व्हिटामिन ए च्या गोळ्या मुलांना दिल्या जात आहेत. ज्या पालकांनी आपल्या मुलांना मिसेल रुबेलाची लस दिली नाही. त्यांनी आपल्या मुलांचे लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन आरोग्य अधिकारी मंगला गोमारे यांनी केले आहे.

आजाराची लक्षणे, यांना अधिक भीती गोवरमुळे भारतात दरवर्षी ५० हजार रुग्ण मुत्यूमुखी पडतात. गोवर झालेल्या रुग्णामध्ये ताप, अंगावर लालसर पुरळ येणे, सर्दी, खोकला व शिंका येणे, श्वास घ्यायला त्रास होणे अशी लक्षणे दिसून येतात. गोवरमुळे रुग्णाच्या शरीरातील 'अ' जीवनसत्त्वाचे प्रमाण खूप कमी होते. त्यामुळे रुग्णाला डोळ्यांचे आजार तसेच रोगप्रतिकार शक्ती कमी झाल्याने अतिसार, मेंदूज्वर, न्यूमोनिया असे आजारही होऊ शकतात. मिसेल रुबेला म्हणजेच गोवर हा आजार लस न घेतलेल्या लहान मुलांसाठी धोकादायक आहे. यामुळे मृत्यू होऊ शकतो. ज्या गरोदर महिलांनी लस घेतली नाही. त्यासुद्धा हाय रिस्कवर असून त्यांनाही याची लागण होण्याची भीती अधिक आहे, अशी माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details