महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Dec 25, 2022, 10:25 PM IST

ETV Bharat / state

Mumbai Corona Update : सावधान! मुंबईत ९ नव्या कोरोना रुग्णांची नोंद

गेल्या काही दिवसात मुंबईतील कोरोनाचा प्रसार आटोक्यात आला आहे. गेले काही दिवस १० पेक्षा कमी रुग्णांची नोंद ( Corona Patients in Mumbai ) होत आहे. काल त्यात किंचित वाढ होऊन १० रुग्णांची नोंद झाली होती. आज ९ रुग्णांची नोंद ( 9 new Corona patients cases ) झाली आहे. आज शून्य मृत्यूची नोंद झाली आहे. मागील काही दिवसात सक्रिय रुग्णांच्या संख्येत घट होत होती. त्यातही वाढ होऊन आज ५० सक्रिय रुग्णांची नोंद झाली आहे.

Mumbai Corona Update
Mumbai Corona Update

मुंबई : चीनमध्ये कोरोनाने हाहाकार उडवल्यामुळे राज्यातही कोरोनाचा धोका वाढत असल्याचे चित्र आहे. गेले काही दिवस १० पेक्षा कमी रुग्णांची नोंद होत होती. आज (ON Sunday ) त्यात किंचित वाढ होऊन ९ रुग्णांची नोंद (FOUND 9 CORONA PATIENT) झाली आहे. तर शून्य मृत्यूची नोंद झाली आहे.

कोरोनाचे ९ नवे रुग्ण : मुंबईत २५ डिसेंबरला २१८६ चाचण्या करण्यात आल्या. त्यात ९ रुग्णांची नोंद झाली. आज आढळून आलेल्या ९ पैकी ८ रुग्णांना कोणतीही लक्षणे नाहीत. १ रुग्ण आज रुग्णालयात दाखल करण्यात आला. सध्या ५ रुग्ण हॉस्पिटलमध्ये असून २ रुग्ण ऑक्सिजनवर आहेत. आज शून्य मृत्यूची नोंद झाली आहे. ३ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. मार्च २०२० पासून आतापर्यंत एकूण ११ लाख ५५ हजार ०९३ रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी ११ लाख ३५ हजार २९७ रुग्ण बरे झाले आहेत. तर १९ हजार ७४६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या ५० सक्रिय रुग्ण ( Active Corona Patients ) आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८.३ टक्के तर रुग्ण दुपटीचा कालावधी १,२१,२९४ दिवस इतका आहे. मुंबईत एकही इमारत झोपडपट्टी सील नाही. गेल्या आठवडाभरातातील कोरोना वाढीचा दर ०.००५ टक्के इतका आहे. मुंबईत सध्या ४४४१ बेडस आहेत. त्यापैकी ५ बेडवर म्हणजे ०.११ टक्के इतक्या बेडवर रुग्ण आहेत.


रुग्णसंख्येत उतार सुरू : मुंबईत गेले दोन वर्षे कोरोनाचा प्रसार आहे. या दरम्यान कोरोनाच्या दोन लाटा आल्या. त्या दोन्ही लाटा थोपवण्यात पालिकेला यश आले आहे. पहिल्या लाटे दरम्यान २ हजार ८०० तर दुसऱ्या लाटेदरम्यान कोरोनाचे ११ हजार ५०० सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली होती. डिसेंबर महिन्यात कोरोनाची तिसरी लाट आली असून ६ ते ८ जानेवारीदरम्यान सलग तीन दिवस २० हजाराच्यावर रुग्ण आढळून आले. त्यानंतर रुग्णसंख्येत घट झाली. मार्च एप्रिल महिन्यात रुग्णसंख्या ५० च्या खाली आली होती. मे महिन्यात रुग्णसंख्या १०० च्या वर गेली. जून महिन्यात रुग्णसंख्या वाढून २३ जूनला २४७९ रुग्णांची नोंद झाली. त्यानंतर त्यात घट होऊन गेले काही दिवस १० हुन कमी रुग्णांची नोंद होत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details