आज दिवसभरात
- आज पश्चिम-मध्य रेल्वे मार्गावर 36 तासांचा मेगाब्लॉक; प्रवाशांचे होणार हाल !
मुंबई- उपनगरीय रेल्वे मार्गावर रेल्वे रुळांची दुरुस्ती आणि तांत्रिक कामासाठी मध्य रेल्वेच्या हार्बर मार्गावर आणि पश्चिम रेल्वे मार्गावर शनिवारी- रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहेत. पश्चिम रेल्वेचा वसई रोड ते भायंदर स्थानकादरम्यान अप जलद मार्गावर आणि हार्बर मार्गावरील छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस - चूनाभट्टी आणि बांद्रा डाउन हार्बर मार्गवर मेगाब्लॉक घेण्यात आलेला आहे.
- वंजारी समाजाचा राज्यस्तरीय मेळावा आज
पुणे - महाराष्ट्र प्रदेश वंजारी सेवा संघाच्यावतीने रविवारी (ता. ९) राज्यस्तरीय वंजारी समाज मेळाव्याचे आयोजन केले आहे. बिबवेवाडी येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सांस्कृतिक भवनात दुपारी तीन वाजता हा महामेळावा होणार आहे.
- पुण्यात आज भाजपच्यावतीन रक्तदान शिबीर
पुणे - भारतीय जनता पार्टी कसबा विधानसभा मतदार संघाच्यावतीनं स्वामी विवेकानंद आणि दिवंगत पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन रविवार दि. ९ जानेवारी, २०२२ रोजी सकाळी ९ ते ४ यावेळेत नुमवि प्रशालेत करण्यात आले आहे.
- विदर्भ, उत्तर महाराष्ट्रासह मराठवाड्यात अवकाळी पावसाची शक्यता
मुंबई - भारतीय हवामान विभागाच्यावतीनं राज्यात ऐन थंडीच्या दिवसात पुढील चार दिवसात विविध ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. उत्तर भारतावरील ताज्या वेस्टर्न डिस्टर्बन्सचा (WD) प्रभाव पडण्याची दाट शक्यता असल्यानं महाराष्ट्रात येत्या काही दिवसात हलका ते मेघगर्जनेसह पाऊस होण्याची शक्यता आहे.
आजचे राशीभविष्य -
काल दिवसभरात -
मुंबई -राज्यात कोरोनाचा उद्रेक ( Corona Patient Increased In Maharashtra ) दिवसेंदिवस वाढतो आहे. आज 24 तासामध्ये सुमारे 41 हजार 434 कोरोना बाधितांची नोंद ( Maharashtra todays Corona Patient ) झाली आहे. 13 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झालेला आहे. तर दिवसभरात 9 हजार 671 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहे. दुसरीकडे ओमायक्रोनचा प्रसार ( Omicron In Maharashtra ) देखील वाढला असून आज 133 रुग्ण राज्यभरात आढळून आले. सक्रिय रुग्ण देखील दीड लाखाच्या ( Active Corona Patient in Maharashtra ) घरात असल्याची माहिती राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने दिली.
मुंबई- कोरोना वाढता प्रादुर्भाव पाहता राज्य सरकारची नवीन नियमावली जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये काही नवीन निर्बंध राज्य सरकारकडून लावण्यात आले आहे. दहा जानेवारीच्या मध्यरात्रीपासून ही नवीन नियमावली राज्यभरात लागू होणार आहे. दहा तारखेच्या मध्यरात्रीपासून राज्यामध्ये नवीन नियमानुसार जमाव बंदी आणि संचार बंदी ( Night curfew in Maharashtra ) असणार आहे.
जळगाव - मोक्का लावण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे, त्या भीतीपोटी गिरीश महाजन यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाली, असा टोला राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी लगावला आहे. 'माझी ईश्वरचरणी प्रार्थना आहे, गिरीश भाऊ लवकर बरे व्हावे, त्यांची प्रकृती स्वास्थ्य चांगले राहावे, त्यांची समाजाला महाराष्ट्राला गरज आहे, असेही ते म्हणाले.
मुंबई - भाजपचे नेते आणि आमदार आशिष शेलार (Ashish Shelar) यांना कुटुंबासह जीवे मारण्याची धमकी (Threatening to Kill) देण्यात आली होती. धमकी देणाऱ्या व्यक्तीला माहिम (Mahim) येथून अटक करण्यात आली आहे. ओसामा शमशद खान असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. ओसामावर यापूर्वी देखील अनेक गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे.
नागपूर - नागपुरातील संघ मुख्यालय (RSS Headquarters) हे दहशतवादी संघटना जैश ए मोहम्मदच्या (Jaish-e-Mohammed) रडावर असल्याचे समोर येताच खळबळ उडाली आहे. 26 वर्षीय तरुण हा नागपूरच्या संवेदनशील भागाची रेकी (Recce in Nagpur) करून परत गेला. पण त्याने नेमक्या कुठल्या भागाची रेकी केली, या सर्व बाबींची माहिती घेण्यासाठी नागपूर क्राईम ब्रांचचे (Nagpur Crime Branch) वरिष्ठ अधिकारी हे डिसेंबरच्या शेवटी श्रीनगरला जाऊन आले आहेत. त्यानंतरच यूएपीए (unlawful activities prevention act) अंतर्गत गुन्हा दाखल करत संघ मुख्यालयाची सुरक्षा वाढवण्यात आली आहे.