मुंबई- कांदिवली येथील समता नगरमध्ये कानडे कुटुंबीयांच्या घरात सिलेंडरमधून गॅस गळती होऊन लागलेल्या आगीत 9 जण जखमी झाले आहेत. जखमींना कांदिवली येथील शताब्दी रुग्णालयात उपचारसाठी दाखल करण्यात आले आहे. त्यापैकी 4 जणांवर उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आले आहे.
कांदिवलीत गॅस सिलेंडरचा स्फोट, ९ जण जखमी - डॉ. बाबासाहेब आंबेडकर शताब्दी रुग्णालय
कांदिवली येथील समता नगरमध्ये कानडे कुटुंबीयांच्या घरात सिलेंडरमधून गॅस गळती झाल्याने आग लागली. यात 9 जण जखमी झाले होते. त्यापैकी चौंघाना उपचार करून सोडण्यात आले, तर पाच जणांवर उपचार सुरू आहेत.
कांदिवली पूर्व येथील जानू पाडा विकास मंडळ येथे कानडे कुटुंबीय राहतात. रात्री गॅस सुरू करताना गळती होऊन आग लागली. त्यात त्यांच्या कुटुंबीयांसह बाजूला राहणारे 9 जण जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने खासगी वाहनाने कांदिवली येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर शताब्दी रुग्णालयात उपाचारासाठी दाखल करण्यात आले. त्यापैकी मेहुल सुरती (वय 30 वर्षे), जयेश सुतार (वय 30 वर्षे), निशांत पांचाळ (वय 10 वर्षे), देवयानी सुरती (वय 46 वर्षे) या चार जणांवर उपचार करून घरी सोडण्यात आले आहे, तर संदिप कानडे (वय 28 वर्षे) हे 30 टक्के भाजले आहेत. शारदा कानडे (वय 56 वर्षे) या 35 ते 40 टक्के भाजल्या आहेत. ओमकार चिके (वय 18 वर्षे) 40 ते 45 टक्के भाजला आहे. दिवेश पटेल (वय 22 वर्षे) 15 ते 16 टक्के भाजला असून राजेश डुबाला (वय 40 वर्षे) हे 30 टक्के भाजले आहेत. या पाच जणांवर रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती आपत्कालीन व्यवस्थापन विभागाकडून देण्यात आली आहे.