महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मुंबईत शुक्रवारी 88,527 लाभार्थ्यांचे लसीकरण

मुंबईत शुक्रवारी 88 हजार 527 हजार लाभार्थ्यांना लस देण्यात आली. त्यात 82 हजार 131 लाभार्थ्यांना पहिला तर 6 हजार 396 लाभार्थ्यांना दुसरा डोस देण्यात आला. आतापर्यंत एकूण 35 लाख 7 हजार 19 लाभार्थ्यांना लस देण्यात आली आहे. त्यात 27 लाख 45 हजार 368 लाभार्थ्यांना पहिला तर 7 लाख 61 हजार 651 लाभार्थ्यांना दुसरा डोस देण्यात आला आहे.

mumbai vaccination
मुंबई लसीकरण

By

Published : Jun 5, 2021, 7:08 AM IST

मुंबई -कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी 16 जानेवारीपासून लसीकरण मोहीम सुरू आहे. या मोहिमेनुसार सोमवार ते बुधवार वॉक इन पद्धतीने येणाऱ्या तर गुरुवार ते शनिवार नोंदणी पद्धतीने येणाऱ्या 45 वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण केले जात आहे. शुक्रवारी 88 हजार 527 लाभार्थ्यांना लस देण्यात आली. तर 16 जानेवारीपासून आतापर्यंत एकूण 35 लाख 7 हजार 19 लाभार्थ्यांना लस देण्यात आली.

लसीकरणाची आकडेवारी -

मुंबईत शुक्रवारी 88 हजार 527 हजार लाभार्थ्यांना लस देण्यात आली. त्यात 82 हजार 131 लाभार्थ्यांना पहिला तर 6 हजार 396 लाभार्थ्यांना दुसरा डोस देण्यात आला. आतापर्यंत एकूण 35 लाख 7 हजार 19 लाभार्थ्यांना लस देण्यात आली आहे. त्यात 27 लाख 45 हजार 368 लाभार्थ्यांना पहिला तर 7 लाख 61 हजार 651 लाभार्थ्यांना दुसरा डोस देण्यात आला आहे. आतापर्यंत आरोग्य कर्मचाऱ्यांना 3 लाख 4 हजार 950, फ्रंटलाईन वर्कर्सना 3 लाख 62 हजार 708, ज्येष्ठ नागरिकांना 12 लाख 34 हजार 813, 45 ते 59 वर्षांमधील नागरिकांना 11 लाख 86 हजार 238 तर 18 ते 44 वर्षांमधील नागरिकांना 4 लाख 14 हजार 291, 1 हजार 433 स्तनदा मातांचे तसेच देशाबाहेर शिक्षण घेण्यास जाणाऱ्या 2 हजार 586 विद्यार्थ्यांना लसीचे डोस देण्यात आले आहेत.

हेही वाचा -मुंबई महापालिकेचे लसीचे ग्लोबल टेंडर रद्द, केंद्राकडे पाठपुरावा करणार

लसीकरण मोहीम -

मुंबईत कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी 16 जानेवारीपासून कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली. सुरुवातीला आरोग्य कर्मचारी व फ्रंट लाईन वर्करना लस दिली जात होती. 1 मार्चपासून 60 वर्षावरील वयोवृद्ध तसेच 45 ते 59 वर्षामधील विविध गंभीर आजार असलेल्या नागरिकांना लस दिली जात आहे. 1 मेपासून 18 ते 45 वर्षांमधील लाभार्थ्यांचे लसीकरण सुरू झाले आहे. सोमवार ते बुधवार ज्येष्ठ नागरिक तसेच दिव्यांग यांचे लसीकरण केले जाणार आहे. तर गुरुवार ते शनिवारपर्यंत कोविन अ‌ॅपवर नोंदणी करून मोबाईलवर संदेश आला असेल तरच लसीकरणाला या, असे आवाहन पालिकेने केले आहे. स्तनदा माता आणि गरोदर महिलांचेही लसीकरण केले जाणार आहे.

एकूण लसीकरण -

आरोग्य कर्मचारी - 3,04,950
फ्रंटलाईन वर्कर - 3,62,708
जेष्ठ नागरिक - 12,34,813
45 ते 59 वय - 11,86,238
18 तर 44 वय - 4,14,291
स्तनदा माता - 1,433
परदेशी शिक्षण विद्यार्थी - 2,586
एकूण -35,07,019

हेही वाचा -मुंबई महापालिकेमधील ग्लोबल टेंडरचा घोटाळा आम्ही उधळून लावला - किरीट सोमैय्या

ABOUT THE AUTHOR

...view details