मुंबई:राज्यात आज ८५० नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. ४ रुग्णांचा मृत्यू झाला असून ६४८ रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात आतापर्यंत कोरोनाचे एकूण ८१ लाख ६१ हजार ३४९ रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी ८० लाख ६ हजार ६८० रुग्ण बरे झाले आहेत तर १ लाख ४८ हजार ५०२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात आज १६,४१२ चाचण्या करण्यात आल्या.
साडे चार महिन्यात ८४ मृत्यू:१ जानेवारीपासून आजपर्यंत गेल्या साडे चार महिन्यात कोरोनामुळे ८४ मृत्यू झाले आहेत. त्यामधील ६० वर्षांवरील नागरिकांचे ७२.६२ टक्के मृत्यू झाले आहेत. इतर आजार असलेल्या नागरिकांचे ८१ टक्के मृत्यू झाले आहेत. १२ टक्के मृत्यू सहबाधित नसलेल्या नागरिकांचे झाले आहेत.
५७ रुग्ण गंभीर:राज्यात २१ एप्रिल रोजी ५९७० सक्रिय रुग्ण आहेत. त्यापैकी ५६७८ म्हणजेच ९५.१ टक्के रुग्ण गृह विलागीकरणात आहेत. २९२ टक्के ४.९ टक्के रुग्ण रुग्णालयात दाखल आहेत. २३५ म्हणजेच ३.९ टक्के रुग्ण सर्वसाधारण वार्डमध्ये उपचार घेत आहेत तर ५७ म्हणजेच १ टक्के रुग्ण आयसीयुमध्ये उपचार घेत आहेत.
मुंबईत १७७ रुग्ण, २ मृत्यू:मुंबईमध्ये आज १७७ रुग्णांची नोंद झाली आहे. २६४ रुग्ण बरे झाले आहेत. २ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या १३७७ सक्रिय रुग्ण आहेत. त्यापैकी ११६ रुग्ण रुग्णालयात दाखल असून ३८ रुग्ण ऑक्सिजनवर आहेत. आतापर्यंत एकूण ११ लाख ६१ हजार ७४६ रुग्णांची, १९ हजार ७६० मृत्यूंची तर ११ लाख ४० हजार ६०९ बरे झालेल्या रुग्णांची नोंद झाली आहे.